महाराष्ट्रात VinGroup ची 6.5 अब्ज डॉलर गुंतवणूक; 5 हजार एकरवर मेगा प्रकल्प

MMRDA व उद्योग विभागासोबत करार; स्मार्ट टाउनशिप, EV मोबिलिटी, सोलर आणि पर्यटन क्षेत्राला चालना
investment
investmentTendernama
Published on

मुंबई (Mumbai): व्हिएतनाममधील VinGroup कंपनी महाराष्ट्रात सुमारे 6.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून, मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक भागांत 5 हजार एकरवर विविध पायाभूत प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून तब्बल 24,700 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

investment
Metro+Pod Taxi: मुंबईत वाहतूक व्यवस्थेचा नवा अध्याय सुरू; मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीला बूस्ट

राज्यातील पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि शहरी विकास क्षेत्राला मोठी चालना देणारा महत्त्वाचा करार पार पडला आहे. VinGroup या व्हिएतनामी कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.

हा करार Mumbai Metropolitan Region Development Authority आणि राज्याच्या उद्योग विभागासोबत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत झाला.

investment
नवी मुंबईचा कायापालट! खारघरमध्ये 120 एकरवर उभे राहणार दुसरे BKC

या गुंतवणुकीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश (MMR) तसेच इतर निवडक भागांत स्मार्ट निवासी टाउनशिप, इलेक्ट्रिक मोबिलिटी, नवीकरणीय ऊर्जा आणि पर्यटन प्रकल्प उभारले जाणार आहेत. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी युक्त टाउनशिप विकसित केली जाणार असून दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे.

याशिवाय राज्यात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर EV टॅक्सी सेवा आणि ‘मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस’ प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. तसेच 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन वापरली जाणार आहे.

investment
Mumbai Water Metro: मुंबईतील वॉटर मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, मल्टीस्पेशालिटी रुग्णालये आणि EV चार्जिंग नेटवर्क उभारले जाणार आहे. पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी 865 एकरवर थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारले जाणार आहेत.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिमान अर्थव्यवस्थेला मोठा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

investment
Mumbai Infra Boost: मुंबईकरांसाठी खुश खबर! 2 तासांचा प्रवास आता अवघ्या 30 मिनिटांत

MMR मध्ये मोठी गुंतवणूक...

  • VinGroup कडून 6.5 अब्ज डॉलर गुंतवणूक

  • 5 हजार एकरवर विविध प्रकल्प उभारणार

  • 24,700 रोजगार निर्माण होणार

  • 500 MW सोलर प्रकल्प आणि EV मोबिलिटी योजना

  • स्मार्ट टाउनशिप आणि पर्यटन प्रकल्पांना चालना

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com