तगादा : 'या' अधिकाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरात शिरले पाणी

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) ः रमणा मारोती मंदिर परिसरातील प्रवेशद्वारा जवळील कामगारनगर व प्रभूनगर वासीयांच्या घरांत पाणी शिरते आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी रमना मारोतीनगर, ईश्वरनगर, प्रभूनगर, सहकारनगर, डायमंडनगर येथे अजिबात लक्ष देत नाही, इथे घाणीचे साम्राज्य आहे, स्वच्छता कर्मचारी येत नाही, अशा तक्रारी नागरिकांच्या आहेत.

Nagpur
नागपूर झेडपीत सत्ताधारी-विरोधक का आले आमने-सामने?

रमणा मारोती प्रवेशद्वारा जवळील सिमेंट रोडला लागून असलेले ले-आऊटमध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना मनपाने पावसाचे पाणी चुकीच्या भागात वळविले. त्यामुळे ते पाणी घरात शिरल्याची तक्रार नागरिकांनी केली. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना चार दिवस घराच्या बाहेर निघता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com