तगादा : रस्त्याचे सिमेंटीकरण केले पण रुंदीकरण करायलाच विसरले!

Accident
AccidentTendernama

नागपूर (Nagpur) : घोटीटोक ते भंडारा राज्य महामार्गाचे सिमेंटीकरण सुरू असताना या भागातील नेत्यांनी मोठमोठी स्वप्ने दाखविली. बंगला चौकाचे सुशोभिकरण करण्याचे आश्वासन दिले होते. रस्ता तर बांधला पण रुंदीकरण करणे विसरले.

या बंगला चौकात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. 11 डिसेंबरला चौकात झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हा चौक आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Accident
Nashik : रोजगार हमीत उजळमाथ्याने ठेकेदारीला प्रवेश; आमदारांची दीड हजार कोटींची...

भंडारा रामटेक हा राज्य महामार्ग असून बोरगाव कोदामेंढी धानोली हा जिल्हा मार्ग आहे. दोन्ही रस्ते ज्या जंक्शनला जोडतात त्याला बंगला चौक म्हणतात. हे रस्ते नेहमी वर्दळीचे असून सतत सतत वर्दळ असते.

घोटीटोक ते भंडारा महामार्गाचे सिमेंटीकरणाचे बांधकाम करण्यात आले तेव्हा या मार्गाने सर्व्हिस रस्ता आणि बंगला चौकाचे रुंदीकरण होणे तितकेच गरजेचे होते. पण राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे ते होऊ शकले नाही.

चौकाचे रुंदीकरण न झाल्याने चौकात वारंवार अपघात होत आहेत. चौकाचे रुंदीकरण करण्यासाठी या भागातील जागा भूसंपादित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे सांगण्यात येते.

Accident
Sambhajinagar : शरणापूर-साजापूर सुसाट! असा होणार चकाचक बायपास

आंदोलनानंतरही कार्यवाही नाही

नांदगाव ग्रामपंचायतीने बंगला चौकाचे रुंदीकरण व्हावे यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून ठराव दिले. चौकाचे रुंदीकरण होण्यासाठी मे 2023 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य योगेश देशमुख यांनी आंदोलन केले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी, महसूल विभाग यांनी हमी दिली. पण काहीच झाले नाही.

बंगला चौकाचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रस्ता व्हावा याकरिता जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी 2020 साली राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना पत्रव्यवहार करून, निवेदने देऊन मागणी केली. पण पुढे काहीच झाले नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com