तगादा : गडचिरोलीतील एनएचएम कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत आंदोलन

Gadchiroli
GadchiroliTendernama
Published on

गडचिरोली (Gadchiroli) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास सर्व कर्मचारी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर जातील, असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समितीने दिला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी नर्सेस (आरबीएसके) शहरी ग्रामीण एएनएम जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माण आधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयूएचएमअंतर्गत कार्यरत, तसेच एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करावे, तसेच बजेट अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 

Gadchiroli
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील 'त्या' कंत्राटदाराला 'जोर का झटका'? BMC ने उचलले मोठे पाऊल

कंत्राटी कर्मचाऱ्यांना च त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे व राज्यातील रिक्त जागेवर समायोजन न करण्याची विनंती केलेली होती. विधानसभेच्या बजेट क्षेत्रात सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर शासनाचे उत्तर म्हणून 31 मार्च 2023 पर्यंत समायोजन करण्यात येईल, असे सांगितले होते; परंतु आश्वासन पाळण्यात आले नाही, असा आरोप संघटनांनी केला. निवेदन देताना कुष्ठरोग तंत्रज्ञ संघटनेचे नीलकंठ ठवळी, आयुष संघटनेचे डॉ. नवरत्नल गायधने, आरबीएसके संघटनेचे सनी कांबळे, क्षयरोग कर्मचारी संघटनेचे पवन वासनिक, आयटक संघटनेचे दिलीप उटाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Gadchiroli
Nagpur : फुटाळा तलावातील म्युझिकल फाऊंटनच्या विरोधातील याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार?

अशी आहे आंदोलनाची दिशा : 

कर्मचायांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 16 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता; परंतु सरकारला गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून 16 ऑक्टोबर रोजी एकदिवसीय राज्यव्यापी आंदोलन नागपूर येथील संविधान चौकात केले जाणार आहे. तसेच 17 ते 23 ऑक्टोबर या कालवधीत राज्यातील जिल्हास्तरावर एकदिवसीय धरणे, मोर्चे व लेखणी बंद आंदोलन करून निवेदन देण्यात येईल, यावरूनही सरकारने दखल घेतली नाहीतर 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com