musical fountain in Futala Lake
musical fountain in Futala LakeTendernama

Nagpur : फुटाळा तलावातील म्युझिकल फाऊंटनच्या विरोधातील याचिकेवर कोर्ट काय निर्णय देणार?

Published on

नागपूर (Nagpur) : फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटन (musical fountain in Futala Lake) नियमानुसार बांधण्यात आलेले नसल्याने फाऊंटन आणि पार्किंग प्लाझाच्या बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका स्वच्छ फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

musical fountain in Futala Lake
Nashik : पालिकेच्या सिंहस्थ कुंभमेळा प्रारुप आराखड्याला आयुक्तांनीच का लावली कात्री?

या प्रकरणावरील सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष ही सुनावणी झाली. 

फुटाळा तलाव पाणथळ प्रदेशात मोडत असल्याने तेथे बांधकाम करणे अवैध असल्याची बाजू स्वच्छ फाउंडेशनतर्फे मांडण्यात आली आहे. हे बांधकाम पर्यावरणास अनुकूल नाही. फुटाळा तलाव परिसराला पाणथळ जमिनीचे सर्व नियम लागू होतात. त्यामुळे तलावात सुरू असलेले बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

musical fountain in Futala Lake
Nagpur : पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस अन् तब्बल 12 वर्षांची प्रतीक्षा! अखेर 'तो' दिवस आलाच

तर सर्व विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच बांधकाम सुरू करण्यात आल्याची बाजू महामेट्रोकडून मांडण्यात आली. राजे रघुजी भोसले यांनी तेलंगखेडी बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी फुटाळा तलाव बांधल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे फुटाळा तलाव हा मानवनिर्मित आहे. मानवनिर्मित तलाव पाणथळ प्रकारात मोडत नाही. या प्रकल्पामुळे नागपूरचे वैभव वाढणार आहे, असेही महामेट्रोतर्फे सांगण्यात आले.

न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेत निर्णय राखून ठेवला आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. मिश्रा, महापालिकेतर्फे अॅड. जेमिनी कासट, माफसूतर्फे अँड. अरुण पाटील तर एनएमआरडीएतर्फे अॅड.. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.

Tendernama
www.tendernama.com