ना जागा, ना टेंडर; तरी नगरसेवकाने थाटले लॉन

Nagpur Vidhanbhavan
Nagpur VidhanbhavanTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्या विरोधकांना अडकवण्याची एकही संधी सोडत नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी त्यांनी एका नगरसेवकाचे सरकारी जमिनीवर सुरू असेलल्या लॉन आणि काँग्रेसच्याच एका नेत्यांच्या खाजगी कंपनीवर निशाणा साधला आहे.

Nagpur Vidhanbhavan
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

संबंधित नगरसेवक काँग्रेसचा असून, माजी मंत्री सुनिल केदार यांचा कट्‍टर समर्थक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विकास ठाकरे यांच्या समर्थकाचा त्याने पराभव केला होता. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा बळकावून तेथ त्याने लॉन टाकला आहे. ठाकरे यांनी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाकडे याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र कोणी दखल घेत नसल्याने त्यांनी थेट सर्वोच्च सभागृहातच ही बाब उघड केली.

Nagpur Vidhanbhavan
जिल्हाधिकाऱ्यांनी केली रस्त्याची पाहणी अन् ठेकेदार लागला कामाला

दुसरीकडे अंबाझरी उद्यानाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाजपच्या कार्यकाळात ही जागा विकसित करण्यासोबतच व्यावसायिक ॲम्युझमेंट पार्कला दिली होती. माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी यासाठी मध्यस्थी केली होती. फुके हेसुद्धा मूळचे काँग्रेसी आहेत. त्यांचे ठाकरे गटासोबत कधीच पटले नाही. त्यामुळे भाजपत प्रवेश करून ते आमदार झाले. फडणवीस यांनी त्यांना आपल्या कार्यकाळात राज्यमंत्री सुद्धा केले होते. फुके यांनी जागा ज्या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली ते सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे विकास ठाकरे यांना एकाच दगडात दोन पक्षांना मारण्याची आयती संधी चालून आली. ॲम्युझमेंट पार्कचे कंत्राट घेणारे काँग्रेसचे पदाधिकारी हे सुद्धा सुनिल केदार समर्थक आणि ठाकरे विरोधक आहे.

Nagpur Vidhanbhavan
मोठी बातमी : गायरानातील अतिक्रमणांवरील कारवाई जानेवारीपर्यंत टळली

राज्य सरकारने महापालिका आणि सुधार प्रन्यासची संबंधित जागा आपल्या ताब्यात घेतली. ती एमटीडीसीला विकसित करण्यासाठी दिली. त्यानंतर एमटीसीने टेंडर काढून गरुडा नावाच्या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली. त्यामुळे विकास ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जागेचा करार रद्द करण्याचे बरेच प्रयत्न केले. या दरम्यान जागा विकसित करताना येथील आंबेडकर भवनच्या इमारतीचा काही भाग पाडला. त्यामुळे ठाकरे यांना आयतीच संधी मिळाली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com