गडकरींच्या वाटेत 'काटे'! कोणी रोखले घरासमोरील रस्त्याचे रुंदीकरण?

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या महाल बंगल्यासमोरून जाणाऱ्या केळीबाग रस्त्याचा विस्तार दुकानदारांनी अडविला आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून त्यांच्यावर हातोडा चालविला जात आहे.

Nitin Gadkari
सिन्नर माळेगाव एमआयडीसीत 40 एकर जमीन घोटाळा; कोणी केली तक्रार?

केळीबाग रुंदीकरणातील एक एक अडथळे दूर करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाने या मार्गाच्या रुंदीकरणातील चार मजली इमारतीवर कारवाई केली. या इमारतीचा तिसरा माळा बुलडोजरच्या सहाय्याने तोडण्यात आला. यापूर्वी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी अनेक दुकाने तोडण्यात आली आहेत. महाल ही जुनी वस्ती असून केळीबाग रोडचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून आहे. कोर्टकचेऱ्या झाल्यानंतर या रस्त्याचा रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जुना रस्ता असल्याने तो अतिशय अरुंद आहे. यात महत्त्वाची बाजारपेठ या रस्त्यावर भरते. चारचाकी सोडा दुचाकीनेसुद्धा या रस्त्यावर वाहतूक करणे अवघड असते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुकाने आणि रस्त्यावरच्या फेरीवाल्यांनी हा रस्ता वर्षभर गजबजला असतो.

Nitin Gadkari
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

शेजारी भाजी बाजार भरतो. गडकरी यांच्या वाड्याच्या शेजाराच दर बुधवारी येथे आठवडी भाजी बाजार भरतो. गडकरी नागपूरचे पालकमंत्री असताना भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र तिकडे जाण्याच कोणीच तयार नाही. त्यानंतर गडकरी यांनी केळीबाग रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मार्गावर बाजारपेठ उध्वस्थ झाली आहे. मोठ्या व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून रस्त्याच्या मागाच्या बाजूला असलेल्या जागा आधीच खरेदी करून ठेवल्या. यात छोट्या दुकानदारांचे मरण झाले.

Nitin Gadkari
मुंबईत ७५ कोटींतून ३८ हेक्टरवर साकारतेय पहिले कांदळवन; उत्सुकता...

या रस्त्याच्या रुंदीकरणातील एक-एक अडथळे दूर करण्यात येत आहे. महापालिकेच्या गांधीबाग झोनअंतर्गत अतिक्रमण विभागाने प्रस्तावित १८ मीटर रुंदीकरणासाठी निखवाडे यांच्या चार मजली घराचा अडथळा दूर करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण विभागाच्या पथकाने इमारतीचा माळा बुलडोजर व पोकलेनच्या सहाय्याने तोडला. त्यामुळे रस्ता रुंदीकरणातील हा अडथळा दूर झाला. मागील वर्षी महाल येथील शनी हनुमान मंदिर पाडण्याची मोठी कारवाई करण्यात आली. मंदिर ३५ फूट उंच असल्याने कारवाईदरम्यान टीटीएल मशीन बोलावण्यात आली. कर्मचाऱ्यांनी टीटीएल मशीनला लोखंडी रोप बांधून जेसीबीच्या सहाय्याने मंदिराचे शिखर ओढले होते. महाल येथील केळीबाग रोडवरील दुकानदारांसाठी नवीन मॉल प्रस्तावित आहे. आता विस्थापित झालेल्या दुकानदारांची संख्या वाढली असून, याच मॉलमध्ये त्यांनही जागा देण्यासंबंधाने मॉलचे नवे डिझाईन तयार करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com