घोटाळ्याची बँक म्हणून परिचित असलेल्या बँकेत टक्क्यांवरून राडा

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : घोटाळ्याची बँक म्हणून परिचित असलेल्या महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या आमसभेत टक्क्यांवरून संचालकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला, एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर अध्यक्ष आणि संचालक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने बैठकीत चांगलाच राडा झाला आहे.

Nagpur
'शिंदे-फडणवीस अजून एक प्रकल्प राज्याबाहेर चाललाय, माहिती आहे का?'

महापालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. करोनामुळे विद्यामान संचालकांना दीड वर्षांचा कार्यकाळ अधिक मिळाला आहे. मध्यंतरी बँकेची निवडणूकसुद्धा जाहीर झाली होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. ती डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने आजी-माजी संचालक एकमेकांचे घोटाळे बाहेर चव्हाट्‍यावर आणत आहेत. एकाच कोटेशनवर संगणकांची खरेदी, टक्का घेऊन कर्ज मंजूर करणे हे प्रकरणे सध्या चांगलेच गाजत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच बँकेतील वातावरण तापले आहे.

Nagpur
मुंबईची कोंडी सोडविणारा कोस्टल रोड २०२३ अखेर पूर्ण : मुख्यमंत्री

सध्या  बँकेत सत्ता असलेले संचालक मंडळ भाजप समर्थित आहे. त्यांचे आश्रयदाते भाजपचे अनेक नेते आहेत. त्यांना विरोध करणारे काँग्रेस समर्थक आहेत. ही बँक आपल्या हातातून जाऊ नये याकरिता सध्या चांगलाच वाद सुरू आहे. काँग्रेस समर्थित राजेश गवरे नावाचे संचालक सातत्याने विरोध करीत असल्याने त्यांना यापूर्वी बैठकीतून निलंबित करण्यात आले होते. यानंतर रविविरी झालेल्या बैठकीत त्यांनी घोटाळे आणि टक्क्यांचा विषय परत झेडल्याने अध्यक्ष व त्यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले होते. ते गवरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे इतर जण त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळे मोठा राडा निर्माण झाला होता. फक्त हाणामारी व्हायची तेवढी बाकी राहिली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com