टॅब खरेदीत 'महाज्योती'चे टेंडर फिक्सिंग? कोणी केला आरोप?
नागपूर (Nagpur) : महाज्योती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकाने तब्बल २० हजार टॅब खरेदीचे टेंडर एका विशिष्ट कंपनीला मिळावे याकरिता मोठी अनियमितता झाल्याचा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.
महाज्योतीच्या वतीने २० हजार टॅब खरेदी करण्यासाठी जेममध्ये टेंडरची नोंदणी केली होती. त्यात नियमानुसार तीन टक्के अनामत रक्कम भरणे ठेकेदाराला आवश्यक होते. मात्र महाज्योतीच्या अधिकाऱ्यांनी ही अट शिथिल करून एक टक्का रक्कम अनामत म्हणून घेतली. त्यानंतर उघडण्यात आलेल्या तांत्रिक आणि आर्थिक टेंडरमध्ये चार कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्या चारही कंपन्यांनी एकाच कंपनीच्या टॅबचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती. त्यात तीन कंपन्यांना पात्र ठरवण्यात आले होते.
एवढ्यासाऱ्या सवलती दिल्यानंतरही एका कंपनीने अमनात रक्कम भरली नसताना त्याच कंपनीला पात्र ठरवले व टॅब पुरवठा करण्याचे टेंडर देण्यात आले. यावरून टॅब याच कंपनीकडून खरेदी करण्यासाठी आधीच अधिकाऱ्यांनी फिक्सिंग केले होते, हे दिसून होते असा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते. याविषयी व्यवस्थाकाला विचारणा केली असता गोलमाल उत्तर देऊन वेळून मारून नेली. आता वित्त अधिकाऱ्यावर दबाव टाकून पेमेंट काढण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही खोपडे यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ही अनियमितता झाली असून, तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही घाईगडबडीत कार्यादेश दिल्याने टॅब खरेदीसाठी प्रकाशित केलेल्या टेंडरला स्थगिती द्यावी, असे म्हटल्याचे खोपडे यांनी सांगितले.