इलेक्ट्रिक बसेसबाबत नागपूर महापालिकेचा मोठा निर्णय; आता...

bus
busTendernama

नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ‘आपली बस’च्या (Apli Bus) ताफ्यात १५ इलेक्ट्रिक बसेसची (EV) भर पडली असून, त्यासाठी पार्किंग व चार्जिंग स्टेशनच्या कामाला वेग आला आहे. खापरी व वाडी येथे चार्जिंग व पार्किंगची व्यवस्था उभी करण्यात येत आहे. वाडी इलेक्ट्रिक बस पार्किंग व चार्जिंग स्टेशनचे बहुतांश काम झाले असून, केवळ विद्युतपुरवठ्याची प्रतीक्षा आहे, तर खापरीसाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेत आणखी १५५ इलेक्ट्रिक बस येणार असल्याने ही लगबग सुरू आहे.

bus
साहेब, तुम्हीच सांगा, समृद्धी महामार्गाचा अंडरपास ओलांडायचा कसा?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात आता इलेक्ट्रिक बसवर भर दिला असून महापालिकेच्या आपली बसमध्ये १५ इलेक्ट्रिक बसची भर पडली. या बस शहरात फिरत आहेत. सध्या तिकिट मशीन ॲपमुळे महापालिकेला नुकसान होत असले तरी भविष्यात इलेक्ट्रिक बस शहरात मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्यामुळे या बसच्या चार्जिंग व पार्किंगची समस्येवर महापालिकेने तोडगा काढला आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुढाकार घेत मेमध्ये खापरी व वाडी येथील दोन्ही जागांची पाहणी करीत पार्किंग व चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले होते.
त्यानुसार वाडी येथे काम सुरू झाले. वाडीच्या जुना जकात नाक्यावर प्रस्तावित बस डेपोमध्ये ४० इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग आणि पार्किंगची व्यवस्था असणार आहे. येथे फ्लोरिंगचे काम पूर्ण झाले असून ११ केव्हीच्या विद्युतपुरवठ्यासाठी महावितरणकडे पैशाचाही भरणा केला. साडेतीन किमीचे खोदकाम करून भूमिगत केबल टाकण्याचे काम पावसामुळे रखडले आहे. येत्या काही दिवसांत विद्युतीकरणाची कामे पूर्ण होताच इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसह पार्किंगही सुरू होणार आहे.

bus
पेमेंटसाठीच ‘एमकेसीएल’ची थांबली हकालपट्टी?; मंत्र्याच्या आदेशाचेही

मे. ई वे ट्रान्स प्रा. लिमिटेड कंपनीला येथील काम देण्यात आले आहे. खापरी येथे पार्किंग व चार्जिंग स्टेशनसाठी टेंडर मागविण्यात आले आहेत. लवकरच ही टेंडर उघडण्यात येणार असून त्यातील काही सुरू करण्यात येणार आहेत. खापरी नाक्यावर सध्या ‘आपली बस’ची पार्किंग सुरू आहे. सध्या येथे ट्रॅव्हल टाइम कंपनीचे बस डेपो असून त्यांना कोराडी येथील बस डेपोत हस्तांतरित करण्यात येणार आहे. मे. हंसा प्रा. लिमिटेड यांचे सध्या हिंगणा रोडवरील बस डेपो खापरी येथे स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. खापरी येथे १५ इलेक्ट्रिक बसेसची पार्किंग केली जाईल. येथे चार्जिंग स्टेशन सुद्धा असणार आहे. तसेच मे. हंसा कंपनीने रिकामे केल्यानंतर हिंगणा रोड डिपोत पुढे ११५ ईव्ही बसेसचे चार्जिंग स्टेशन व डिपो करण्याचे प्रस्तावित आहे.

bus
आदिवासी विभागाचे 'ते' 113 कोटींचे टेंडर कुणासाठी केले फ्रेम?

खापरी येथे चार्जिंग स्टेशन व पार्किंगसाठी टेंडर आले असून लवकरच ते उघडण्यात येतील. वाडी येथे फ्लोरिंगपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. येथे विद्युत पुरवठ्यासाठी महावितरणकडे पैसेही जमा करण्यात आले आहे. साडेतीन किमी अंतरावरून वीजपुरवठा घेण्यात येणार असून भूमिगत केबल टाकण्यात येणार आहे. तुर्तास पावसामुळे हे काम बंद असून लवकरच वीजपुरवठा सुरू होईल.
- रवींद्र भेलावे, उपायुक्त, परिवहन व्यवस्थापक, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com