नाशिक मनपाने काय दिला 'जलसंपदा'ला प्रस्ताव?

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये 98 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा असून यावर्षी चांगल्या पावसामुळे सिंचन व पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने 31 जुलै 2023 पर्यंत 5800 दलघफु पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे दिला आहे.

Nashik Municipal Corporation.
शिंदे-फडणवीस सरकारचा पुन्हा यू-टर्न? 'हा' निर्णय फिरविण्याची...

जलसंपदा विभागाकडून दरवर्षी 15 ऑक्टोबरला धरणांत असलेल्या साठ्याचे शेती, उद्योग व पिण्यासाठी असे नियोजन केले जाते. त्यासाठी संबंधित संस्थांकडून पाणी मागणी 15 सप्टेंबरला नोंदवून घेतली जाते. त्यानुसार नाशिक महापालिकेने पुढील वर्षी 31 जुलैपर्यंत नाशिक शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन 5800 दलघफु पाणी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.  या प्रस्तावानुसार गंगापूर धरणातून 4200 दलघफु, मुकणे धरणातून 1500 दलघफु व दारणा धरणातून 100 दलघफु पाणी नाशिक महापालिका उचलणार आहे.

Nashik Municipal Corporation.
हार्बर रेल्वेमार्गावरून प्रवास करणारांसाठी गुड न्यूज; ३५०० कोटी..

शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी गंगापूर व मुकणे धरणातून थेट जलवाहिनी असून दारणा धरणातील पाणी नाशिक रोड येथून दारणा नदीतून उचलले जाते. मात्र, तोपर्यंत नदीपात्रात भगूर, देवळाली कॅम्प येथील सांडपाणी मिसळत असल्याने ते पाणी शुद्ध करणे अवघड होते. तसेच दारणा नदीतील पाणी नाशिक शहरासाठी उचलणे महापालिकेला गैरसोयीचे ठरत आहे. यामुळे नाशिक महापालिका यापूर्वीही दारणा धरणातील आरक्षित पाण्याच्या बदल्यात गंगापूरमधून वाढीव पाणी द्यावे, अशी मागणी करीत आली आहे. त्यामुळे दरवर्षी दारणामधून पाणी उचलण्यात कपात केली जात आहे. त्यानुसार यावर्षी दारणामधून केवळ 100 दलघफु पाणी उचलले जाणार असून 100 दलघफु कपात केली आहे. या कपातीची भर गंगापूर धरणातून 4200 दलघफु पाणी उचलून केली जाणार आहे.

Nashik Municipal Corporation.
दुष्काळात तेरावा महिना; चांदणी चौकातील पूल पाडण्यात आता ही अडचण...

यापूर्वी गंगापूर धरणातून 3900 दलघफु पाणी उचलले जायचे. यावर्षी गंगापूरमधून वाढीव 300 दलघफु पाण्याची मागणी केली आहे. गंगापूर धरणाची क्षमता 5600 दलघफु असून त्यातील 4200 दलघफु पाणी पिण्यासाठीआरक्षित झाल्यास शेतीसाठी आरक्षित असलेल्या पाण्यावर यामुळे ताण येणार आहे. दरम्यान गंगापूर धरण समूहात कश्यपी व गौतमी ही आणखी दोन धरणे असून त्यांच्यातील पाण्याचा वापर प्रामुख्याने गंगापूर डावा कालव्यावरील सिंचनासाठी केला जातो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com