नाशकात रस्त्यांवर खड्डे किती? सर्व 9 हजार बुजवले, दिसतायत ते...

Pothole
PotholeTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक शहरात गेल्या दोन वर्षांत सहाशे कोटी रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्यांवर पावसामुळे हजारो खड्डे (Potholes) पडले आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबत महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बांधकाम विभागाकडून वेगवेगळे हस्यास्पद दावे केले जात आहेत. बांधकाम विभागाने नऊ हजार खड्डे बुजवले असून सध्या शहरातील रस्त्यांवर असलेले तीन हजार खड्डे नव्या पावसाचे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या दाव्यांमुळे अकबर-बिरबल या बालकथेतील 'शहरात कावळे किती?' या गोष्टीची आठवण येत आहे.

Pothole
नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यच झाले ठेकेदार?

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील रस्ते गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी बुजवण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान याच काळात शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे दौरे झाले. त्यामुळे बांधकाम विभागाने शहरातील रस्ते युद्ध पातळीवर बुजवले. काही ठिकाणी तर डांबरी रस्त्यांवर सिमेंटचे अस्तर लावले. गणेशोत्सवापूर्वी शहरातील नऊ हजार खड्डे बजावण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली असून, शहरातील रस्त्यांवर असलेले तीन हजार खड्डे हे गेल्या तीन दिवसांतील पावसाचे आहेत. तसेच ते खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले.

Pothole
वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलवसुलीचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात

त्रयस्थ संस्थेकडून चौकशी

शहर खड्डेमय झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी त्याचे खापर गुणवत्ता नियंत्रण विभागावर फोडले आहे. शहरातील रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहता नव्याने होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा आता त्रयस्थ संस्थेकडून तपासला जाणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे येथील तांत्रिक संस्थांकडे विचारणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Pothole
साधुग्राम वगळून सिंहस्थांचे नियोजन; भूसंपादनाऐवजी बजेट फुगवण्यावरच

कुंभमेळा कामांची तपासणी

शहरातील रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांत जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, यंदाच्या पावसात सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. शहरातील रस्ते तपासण्यासाठी महापालिकेचा गुणवत्ता नियंत्रण विभाग आहे. या विभागाने ठेकेदारांशी हातमिळवणी केल्यामुळेच नव्याने होणाऱ्या रस्त्यांची चाळणी झाली, असे आरोप होत आहेत. यामुळे आयुक्तांनी त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या कामांची तपासणी आयआयटी मुंबईकडून करण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर तपासणी केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com