घोळ संपेना; नाशिक मनपावर का आली रि-डेंटर काढण्याची वेळ?

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) टेंडर प्रक्रियेतील (Tender) संशयाचे वातावरण दूर होण्याचे नाव घेत नाही. महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाची स्वच्छता आउटसोर्स करण्यासाठी काढलेल्या टेंडरमध्ये कागदपत्र जोडून घेण्याचा आधीच्या आयुक्तांचा निर्णय विद्यमान आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी बदलवत फेरटेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik Municipal Corporation.
'त्या' झुलत्या पुलासाठी ९८ कोटींचे टेंडर; 550 मीटर अंतरात पूल

करोना काळात रुग्णालयाची स्वच्छता आउटसोर्सिंगने करण्यास विरोध केल्यानंतर काही काळ जाऊ देत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्वच्छतेचा ठेका नव्याने देण्याचा घाट घातला. नवीन बिटको रुग्णालयाची पाच मजली इमारतीची स्वच्छता करण्यासाठी वार्षिक दोन कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले. त्या टेंडरप्रक्रियेसाठी 11 संस्थानी सहभाग घेतला. त्यातील दहा संस्थांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा करण्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी मुदत दिली होती.

Nashik Municipal Corporation.
जलजीवनच्या पाणी पुरवठा योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय; ही संस्था..

दरम्यान, रमेश पवार यांची तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिकेतील टेंडर प्रक्रियेबाबत सुरू असलेला घोळ लक्षात घेऊन ऑफलाइन कागदपत्र घेण्यासचा निर्णय रद्द केला व या कामाचे फेर टेंडर काढण्याचे निर्देश दिले. कागदपत्रांसाठी ठेकेदारांना मुदत न देता फेरटेंडर काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार फेरटेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com