कामांना स्थगितीच्या नावाखाली नाशिक डीपीसीने अडवले 20 कोटी

Nashik Z P
Nashik Z PTendernama

नाशिक (Nashik) : राज्य सरकारने 1 एप्रिल 2021 नंतर निधी मंजूर झालेल्या व आता काम सुरू नसलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, निर्णयाचा विपर्यास करीत जिल्हा नियोजन समितीने (DPC) पूर्ण झालेल्या कामांची देयके देण्यासाठी मागणी येऊनही निधी न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे जवळपास 20 कोटींची देयके रखडली आहेत. जिल्हा नियोजन समितीने पालकमंत्री नसल्याचे कारण देत, निधी अडवण्याची भूमिका घेतली आहे.

Nashik Z P
नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यच झाले ठेकेदार?

जिल्हा नियोजन समितीकडून राज्याच्या अंतर्गत असलेल्या शिक्षण, आरोग्य, जलसंपदा, कृषी, जलसंधारण आदी प्रादेशिक विभागासह जिल्हा परिषदेला जिल्हा विकास आराखड्यात मंजूर केल्याप्रमाणे नियतव्यय दरवर्षी एप्रिल अथवा मे मध्ये दिला जातो. त्यानुसार त्या त्या विभागाकडून आराखड्यानुसार निधीचे नियोजन करून कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या जातात. यावर्षी मे मध्ये सर्व विभागांना जिल्हा नियोजन समितीने नियतव्यय मंजूर केला. दरम्यान जिल्हा परिषदेने यावर्षी अद्याप आराखड्यानुसार नियोजन करून त्यास मान्यता दिली नाही. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागांना पत्र पाठवून 1 एप्रिल 2021 नंतर निधी मंजूर झालेल्या व टेंडर प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश मिळूनही कामे सुरू नसतील, अशा सर्व कामांना स्थगिती देण्यासाठी या कामांची यादी तयार करून ती सक्षम प्राधिकरणकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते.

Nashik Z P
नागपूर महापालिकेला एक कोटीत पडणार बाप्पाचे विसर्जन

दरम्यान यापूर्वी टेंडर प्रक्रिया राबवून सुरू झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची देयके मिळावी म्हणून जिल्हा परिषदेकडे सादर केली आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणी केली. मात्र, सध्या कामांवर स्थगिती असल्याने निधी दिला जात नाही. आतापर्यंत जिल्हा परिषदेकडून जवळपास 50 कोटींच्या देयकांसाठी निधी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीकडून सध्या स्थगिती असल्याचे कारण दिले जात आहे. खरे तर शासनाच्या कोणत्याही आदेशात निधी वितारणास स्थगिती दिलेली नाही, तसेच सुरू असलेल्या कामानाही स्थगिती नाही. तरीही जिल्हा नियोजन समिती पूर्ण झालेल्या कामांची देयके देण्यासाठी स्थगितीच्या नावाखाली अडवणूक करीत असल्याचे दिसते आहे.

Nashik Z P
मेट्रोतील पुणेकरांवर येथून राहणार लक्ष; 15 दिवसांत येणार ट्रॅकवर..

सरकारने कामांना स्थगिती दिल्यानंतर अद्याप पालकमंत्र्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. आतापर्यंत 20 कोटींची निधी मागणी आली असून पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार निधी वितरित केला जाईल, असे जिल्हा नियोजन समितीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, यामुळे ठेकेदारांच्या चकरा वाढत असून, त्यांच्या सततच्या तगाद्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com