'त्या' 8 ठेकेदारांना नाशिक महापालिकेचा दणका; 6 कोटींच्या बिलातून..

Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation.Tendernama

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील ( Nashik City ) उद्यांनाची निगा राखण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून महापालिकेच्या ( Nashik Municipal Corporation ) उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी आठ ठेकेदारांना ( Contractors ) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या ठेकेदारांच्या देयकांची रक्कम दंड म्हणून परस्पर वळवली जाणार असल्याचे नोटिशीत स्पष्ट केल्याने ठेकेदार कामांची देयके टाकण्यास घाबरत आहेत. शहरातील 200 उद्यानांची देखभाल करण्यासाठी 8 जणांना वार्षिक 6 कोटींचे टेंडर देण्यात आले आहे.

Nashik Municipal Corporation.
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमुळे नाशकातील ६ तालुक्यांतील शेतकरी मालामाल

नाशिक शहरात 527 उद्याने असून त्यामुळे उद्यांनाचे शहर म्हणून नाशिक नावारुपाला आले आहे. पण, उद्यांनाची निगा राखली जात नसल्याने अनेक उद्यांनाना अवकळा प्राप्त झाली आहे. शहरातील सहा विभागांतील 527 उद्यानांपैकी दोनशे उद्यानांची निगा ठेकेदारांकडून राखली जाते. उर्वरीत 327 उद्यानांचे व्यवस्थापन महापालिका उद्यान विभागाकडून केले जाते.

Nashik Municipal Corporation.
'त्या' जागेच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत पडली ६७८ कोटींची भर

महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यान देखभालीचे सहा कोटींचे टेंडर आठ ठेकेदारांना दिले आहे. त्यांच्याकडे दोनशे उद्यानांची निगा व स्वच्छता ठेवण्याचे काम आहे. मात्र, उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयीसुविधांचा अभाव आहे. अनेक उद्यांनामध्ये गाजर गवत वाढलेले आहे. काही ठिकाणी झाडांची छाटणी केली जात नाही. कचरा उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला आहे. अनेक उद्यानांमध्ये हिरवळ जळून गेली आहे. खेळण्या तुटल्या आहेत. उद्यानांच्या दुर्दशेमुळे उद्यान विभागाने ठेकेदारांना नोटिसा बजावल्या असून त्यांच्या देयकातून दंडाची रक्कम वसूल केली केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

Nashik Municipal Corporation.
ठाण्यातील टेंडरवरून मंत्री चव्हाणांनी प्रशासनाला दिली डेडलाईन, का?

15 कर्मचार्‍यांनाही नोटिसा

महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ३२७ उद्यांनाची निगा राखली जाते. तेथेही काही कर्मचार्‍यांकडून कामात हलगर्जीपणा आढळला आहे. यामुळे अशा पंधरा कर्मचार्‍यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com