VIP Protocol Vehicle Scam: मर्सिडीजसाठी नाशिकमध्ये 12 हजार तर संभाजीनगरमध्ये 47 हजार; राजशिष्टाचाराच्या वाहन भाड्यात महाघोटाळा

ट्रॅव्हल्स कंपन्यांनी संगनमत करून सरकारी तिजोरी लुटल्याचा 'टेंडरनामा'चा मोठा पर्दाफाश; राजशिष्टाचाराच्या वाहनांसाठी संभाजीनगरमध्ये नाशिकपेक्षा दोन ते चारपट जादा दर मंजूर
Mantralaya
MantralayaTendernama
Published on

नाशिक (Nashik): राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून भाड्याने घेतल्या जाणाऱ्या व्हीआयपी वाहनांच्या दरांमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. संपूर्ण राज्यात वाहनांच्या किमती आणि इंधनाचे दर जवळपास समान असताना, सामान्य प्रशासन विभागाने (GAD) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले वाहनांचे भाडे नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत दोन ते चार पटीने अधिक असल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या शहरांतील कंत्राटदारांनी संगनमत (Ring) करून टेंडर भरत सरकारी तिजोरीची राजरोस लूट सुरू केल्याचे समोर आले आहे.

Mantralaya
Bullet Train: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रखडली, आता बुलेट ट्रेनचा नवा प्रस्ताव?

राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल व मंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांना वाहने पुरवण्यासाठी त्या त्या जिल्हा प्रशासनाकडून वाहने भाडेतत्वावर घेतली जातात. त्यासाठी टेंडर प्र्क्रिया राबवून त्याला सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घेतली जाते. या राजशिष्टाचारासाठी सामान्यप्रशासन विभागाने नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी मंजूर केलेल्या वाहनांच्या भाडे दरात दोन ते चार पट फरक असल्याचे उघड झाले आहे.

राज्यभरात वाहनांच्या किंमती व इंधनाचे दर जवळपास समान असताना दरांमध्ये दुप्पट ते चौपट फरक असण्याचे कारण काय, असा प्रश्न  उपस्थित होत आहे. नाशिक, ठाणे, पुणे व संभाजीनगर येथील ठराविक ठेकेदारच टेंडरमध्ये सहभागी होऊन विशिष्ट कंपनीला वाहने पुरवण्याचा ठेका मिळेल, या पद्धतीने दर भरून उघड उघड सरकारी लूट करीत असल्याचे यातून समोर आले आहे.

विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागही उघड्या डोळ्यांनी या लुटीला मान्यता देत आहे. राज्य पातळीवर वाहनांचे 'प्रमाणित दर' निश्चित न केल्यामुळे या लुटीला वाव मिळाला आहे.

Mantralaya
नंदूरबार आणि गडचिरोलीवर निधीची उधळण, नाशिकचे ठेकेदार आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार!

राष्ट्रपती, मुख्यमंत्री , राज्यपाल, मंत्री जिल्हा दौ-यावर आल्यानंतर त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या राजशिष्टाचार शाखेकडून वाहने पुरवली जातात. ही वाहने भाड्याने घेण्यासाठी राजशिष्टाचार शाखा टेंडर प्रक्रिया राबवत असते.

नाशिक येथे वर्षानुवर्षे एकाच कंपनीला वाहने पुरवण्याचा ठेका दिला जात होता. त्यासाठी संबंधित कंपनी व प्रशासन संगनमत करीत असल्याने इतर कंपन्यांनी मागील वर्षी यात स्पर्धा निर्माण होईल, असे दर भरले. त्यानंतरही त्याच जुन्या कंपनीचे दर सर्वात कमी (एल वन) असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, संबंधित कंपन्यांनी याला न्यायालयात आव्हान दिले. त्यात या कंपन्यांच्या कंपन्यांच्या बाजूने निकाल लागला. यामुळे सामान्य प्रशासन विभागाने त्या नवीन कंपन्यांना वाहनांचा ठेका देणारा शासन निर्णय निर्गमित केला. या स्पर्धेमुळे नाशिकमधील वाहनांच्या भाड्याचे दर स्पर्धात्मक राहिल.

Mantralaya
मुंबई महापालिकेच्या 2,540 कोटींच्या कचरा प्रकल्पावर वडेट्टीवारांचे गंभीर आरोप; कंत्राटदारासाठी 'बॅकडोअर एंट्री'चा संशय

दरम्यान संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने यावर्षी राजशिष्टाचारासाठी वाहने भाडेतत्वाने घेण्यासाठी टेंडर राबवले. त्यात पुणे येथील ब्ल्यू मेरिडियन हॉलिडे, नाशिकची अथर्व कार रेंटल, ठाणे येथील पेटको कॅब्स व नाशिकच्या गणेश ट्रॅव्हल या चार कंपन्यांनी सहभाग घेतला. वरील कंपन्यानी सगनमत करून अथर्व कार रेंटल पेक्षा जादा दर टाकले. यामुळे अथर्व कार रेंटलला वाहने पुरवण्याचा ठेका मिळाला.

विशेष म्हणजे अथर्व कार रेंटलला राजशिष्टाचार शाखेकडे वाहने पुरवण्याचा अनुभव नसतानाही त्यांना टेंडर मिळाले. संभाजी नगर येथील वाहने भाड्याने घेण्याच्या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या कंपन्या या वेगवेगळ्या ठिकाणच्या टेंडरमध्ये एकमेकांना मदतीची भूमिका घेतात.  

पुण्यात वाहन ठेका ब्लू मेरिडियन हॉलिडे यास मिळावा त्यासाठी गणेश ट्रॅव्हल टेंडर प्रक्रियेत सहभागी होऊन ज्यादा दर भरते. ठाण्यात पेटको कॅप्सचे दर एल वन ठरावे यासाठी ब्लू मेरिडियन हॉलिडे विविध प्रक्रिया सहभागी होऊन जादा दर भरतात. त्यातील नाशिकमधील अथर्व व गणेश या दोन्ही कंपन्यांचा पत्ता एकच आहे. अथर्व कार रेंटल ही कंपनी नाशिकमधील मनीषा शिनकर यांची असून त्यांचे पती विनोद शिनकर यांची गणेश ट्रॅव्हल ही कंपनी आहे. यामुळे या चार कंपन्या एकत्र येऊन प्रशासनातील अधिका-यांशी संगनमत करून वाढीव दराने टेंडर मिळवत सरकारची लूट करीत असल्याचे दिसत आहे.

Mantralaya
Tender Scam : महाराष्ट्राचे ‘आरोग्य’ बिघडले! 62 कोटींच्या 'त्या' टेंडरमध्ये मोठा घोटाळा; पाचपट दराने...

असा आहे वाहनांच्या दरांमधील फरक
लक्झरी गाड्यांच्या दरात झालेली लूट सर्वाधिक धक्कादायक आहे. एकाच वाहनासाठी चार पट जादा रक्कम मोजून शासकीय तिजोरीची राजरोस लूट सुरू आहे. नाशिकमध्ये मर्सिडीज कारचा ८ तास / ८० किमीसाठीचा दर १२,००० रुपये असताना, संभाजीनगरमध्ये हाच दर थेट ४७,००० रुपये मंजूर करण्यात आला आहे. नाशिकमध्ये इनोवा क्रिस्टा साठी ८ तास / ८० किमीसाठीचा दर २५०० असून हाच दर संभाजीनगर मध्ये ४८०० रुपये आहे. नाशिकमध्ये  इनोव्हा हाय क्रॉस साठी ८ तास / ८० किमीसाठीचा दर २६०० रुपये असून संभाजीनगर मध्ये हा दर ६५००  रुपये आहे.

याशिवाय गाडी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त चालल्यास आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त दरात मोठा घोळ आहे. इनोव्हा क्रिस्टासाठी नाशिकमध्ये प्रति किमी केवळ २० रुपये अतिरिक्त दर आहे, तर संभाजीनगरमध्ये तो थेट ८० रुपये प्रति किमी आहे. वेळेची मर्यादा ओलांडल्यावर लावण्यात येणारा प्रति तास दरही संशयास्पद आहे.

नाशिकमध्ये इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर गाड्यांसाठी अतिरिक्त वेळेसाठी केवळ ८० रुपये प्रति तास दर निश्चित आहे. याउलट छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रिस्टासाठी ३०० रुपये आणि फॉर्च्युनरसाठी तब्बल ५०० रुपये प्रति तास दर मंजूर करून कंत्राटदारांचे भले केले असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट दिसत आहे. 

Tendernama
www.tendernama.com