कोस्टल रोडचे 'इतके' काम पूर्ण; दुसऱ्या दिशेच्या टनेलिंगचे कामही...

Coastal Road
Coastal RoadTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पाच्या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. "मावळा" ( टीबीएम मशीन) ने दुसऱ्या बोगद्याचा ६०० मीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल असा विश्वास मुंबई महापालिका प्रशासनाला आहे. येत्या सहा महिन्यात दुसऱ्या दिशेने टनेलिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Coastal Road
मुंबई मेट्रो-3 : 'या' तारखेला धावणार पहिली प्रोटोटाइप मेट्रो

कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील प्रवास सुखकर होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रकल्पाचा वेग मंदावला होता. मात्र आता या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील एकूण १११ हेक्टरपैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणी पूर्ण झाली आहे. तर, तटीय भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या १७५ एकल स्तंभ खांबापैकी ७० म्हणजे ४० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. जमिनीखाली १० ते ७० मीटर खोल दोन बोगदे खोदले जात असून चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळ्याने २.०७२ किलोमीटरचा पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा ११ जानेवारी २०२२ रोजी पार केला आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम ३० मार्च रोजी मावळ्याने सुरु केले आहे. छोटा चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क २.०७२ किलोमीटरपर्यत बोगदा खोदण्यात येत असून तीन महिन्यांच्या कालावधीत ६०० मीटरहून अधिक अंतर पार केल्याने पुढील सहा महिन्यांत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकल्पात प्रत्येकी २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यापैकी, प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गाकडे (मरिन ड्राईव्ह) जाणारा बोगदा यापूर्वीच पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे देखील ३९ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Coastal Road
'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग' तंत्रज्ञानाची कमाल; कोस्टल रोड प्रकल्पात

बोगदा खोदणारा मावळा टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल २३०० टन आहे. तर व्यास १२.१९ मीटर आहे. मावळा मशीनची उंची चार मजली इमारती एवढी आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. कोस्टल रोडच्या कामामुळे प्रियदर्शनी पार्क, अमरसन्स, भुलाभाई देसाई रोड, वरळी या परिसरात पावसाळ्यात पाणी जमा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. मरिन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान नाले आहेत ते कोस्टल रोडच्या कामामुळे बाधित झाले नसून मरिन ड्राईव्ह, हाजी अली, वरळी येथील नाल्यांची क्षमता वाढवली आहे. १०० मीटर पर्यंत रिक्लमेशन केले असले तरी त्याच्या खालून जाणारे नाले समुद्रापर्यंत नेले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com