Virar Alibaug Corridor
Virar Alibaug CorridorTendernama

Tender News : 19 हजार कोटींच्या विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी 33 टेंडर

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी (Virar Alibaug Corridor) ३३ टेंडर (Tender) भरण्यात आली आहेत. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ९६ किमी लांबी मार्गाच्या अकरा पॅकेजच्या उभारणीसाठी १९ हजार ३३४ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे.

Virar Alibaug Corridor
Naredra Modi : मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक धावणार बुलेट ट्रेन

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच विरार-अलिबाग अंतर कमी करण्यासाठी विरार-अलिबागदरम्यान १२८ किमीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ९६ किमी लांबीच्या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू वसईतील बापाणे गावात असून शेवटचा बिंदू उरणमधील चिरनेर आहे.

हा कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. यामध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल, पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत.

Virar Alibaug Corridor
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 'या' तालुक्यांसाठी Good News! 900 कोटीतून तयार होणार 106 किमीचा...

हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

त्यासोबतच समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना – नांदेडपर्यंत केला जाणार आहे. यासाठी 'एमएसआरडीसी'ने १९० किलोमीटर लांबीचा जालना – नांदेड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड अर्थात पुणे वर्तुळाकार रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १३६ किमीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.

Virar Alibaug Corridor
Nashik : गोहरणच्या गौणखनिज उत्खननावरील कारवाईचा निव्वळ फार्स; खडीक्रशर दिवसा सील रात्री सुरू

या तिन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठीची आर्थिक टेंडर गुरुवारी खुली करण्यात आली आहेत. यात १८ कंपन्यांनी तिन्ही प्रकल्पांतील २६ टप्प्यांसाठी एकूण ८२ टेंडर भरली आहेत. यात एल ॲण्ड टी, ॲपको इन्फ्राटेक, एनसीसी, पटेल इन्फ्रा, ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, नवयुग इंजिनीयरिंग कंपनी अशा नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

आता या टेंडरची छाननी करून ती अंतिम करण्यात येणार आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये ही टेंडर अंतिम होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com