राज्य सरकारचे 'ते' लाडके कंत्राटदार कोण? आदित्य ठाकरेंच्या 'मलाई पे मलाई' ट्विटची चर्चा

Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama

मुंबई (Mumbai) : युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी डिलाईल रोड पूल, गोखले पूल व नवी मुंबई मेट्रोच्या रखडलेल्या कामांवरून व उद्घांटनावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. खोके सरकार हे जनतेची कामे करण्यापेक्षा घाणेरड्या राजकारणात व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे.

Aditya Thackeray
अबब! सरकारकडून 72 रुपये किलो सुतळीची 410 रुपयांना खरेदी; कोणी केला आरोप?

अंधेरीचा गोखले पूल लवकरच वाहतूकीसाठी सुरू होणार अशी चर्चा होती. मात्र आता हा पूल 15 फेब्रुवारीनंतर सुरू होणार असल्याचे समोर आले आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. ''पुन्हा एकदा उशिर! हे नेहमीचं झालंय! डिलाईल रोड पूल असो की मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला अंधेरीचा गोखले पूल. बराच काळ तो बंदच आहे. तो बंद होण्याची कारणे, तो कसा दुरुस्त करावा या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, संस्थांकडून आलेल्या अहवालातला फरक आणि नागरिकांना सहन करावा लागत असलेला त्रास ह्यावर आम्ही वारंवार आवाज उठवला होता, तरी त्याकडे दुर्लक्षच केले गेले. त्यापाठी काही राजकीय स्टंटबाजी होती की वेगळा दबाव? महत्वाचे म्हणजे दोन्ही पूलांमध्ये दिरंगाई करणारे कोण? रेल्वे! प्रत्येक कामासाठी हेच सुरु आहे, 'तारिख पे तारिख!' आणि शिंदे-भाजपा सरकारच्या लाडक्या कंत्राटदारांसाठी मलाई पे मलाई, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Aditya Thackeray
Mumbai : 'DBS' रियल्टीला दिलेले 'ते' सोळाशे कोटींचे बीएमसीचे टेंडर रद्द!

तसेच नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनावरूनही आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'सुमारे चार महिन्यांपासून नवी मुंबई मेट्रो उद्घाटनासाठी सज्ज आहे. पण खोके सरकारला सामान्य नागरिकांसाठी वेळ नसून, घाणेरड्या राजकारणात ते व्यस्त आहेत. सार्वजनिक सेवेसाठी महत्वाचे असलेले उद्घाटन असे रखडत ठेवणे योग्य आहे का? सरकारकडे लोकांसाठी आणि सार्वजनिक सेवांसाठी वेळ नसेल, तर कुठल्याही सोहळ्यासाठी न थांबता त्या सुविधा लोकांसाठी तातडीने खुल्या करायला हव्यात', अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com