मंत्री सत्तार यांच्या मर्जीतील कंपन्यांवर 150 कोटींची खैरात

नियम डावलून टेंडर मॅनेज
Abdul Sattar
Abdul SattarTendernama

मुंबई (Mumbai) : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या बोगस टोळीने अकोल्यात खंडणीसाठी घातलेल्या धाडीची बोंबाबोंब सुरु असतानाच आता महाराष्ट्र कृषीउद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून सत्तार यांच्या मर्जीतील एकाच व्यक्तीच्या दोन कंपन्यांवर १५० कोटींची खैरात करण्यात आलीआहे. सेंद्रीय कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेले टेंडर मर्जीतील संबंधित कंपन्यांसाठी नियम डावलून मॅनेज करण्यात आलेआहे. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे.

Abdul Sattar
व्वा रे शिंदे सरकार! दोषी अभियंत्यालाच दिले पदोन्नतीचे 'बक्षिस'

हे टेंडर “के. बी. बायो ऑर्गनिक प्रा. लि. आणि न्यू एज ऑग्रि. इनोव्हेशन प्रा. लि.” या ठाणेस्थित एकाच व्यक्तीच्या दोन कंपन्यांनामिळावे यासाठी टेंडरमध्ये विशिष्ट अटी शर्थी फ्रेम करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन इतर कंपन्या टेंडरच्या स्पर्धेतून बाद करणे शक्यहोईल. तसेच, नियम डावलून हे टेंडर एक ऐवजी दोन वर्षे कालावधीचे करण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात उपयोगी ठरणारे तसेच पर्यावरणाचा समतोलसाधण्यासाठी व रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी व्हावा या उद्देशाने नीमबेस अर्थात सेंद्रीय कीटकनाशक देण्यात येते. हेकीटकनाशक शेतकऱ्यांना मोफत दिले जाते. ही खरेदी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत करण्यात येते.

Abdul Sattar
राज्यात 'याठिकाणी' होणार 6 शिवसृष्टी; वर्षभरात 400 कोटींची कामे

यावर्षी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने झिंक सल्फेट (हेप्टा हायड्रेट) झेन-21टक्के, फेरस सल्फेट (एफई-19टक्के), कॉपरसल्फेट (सीयू-24 टक्के), मँगनीज सल्फेट (एमएन-30.5 टक्के), मॅग्नेशियम सल्फेट (एमजी-9.6टक्के), बोरॉन - 10.5 टक्के, सल्फर 90 टक्के (ग्रॅन्युल) सूक्ष्म पोषक ग्रेड-1 (माती वापरासाठी) मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 (फोलियर ऑप्लिकेशनसाठी) व सूक्ष्म पोषकग्रेड-3 (माती वापरासाठी - आम्ल माती) खरेदीसाठी टेंडर काढले होते. यासाठी 11 कंपन्यांनी टेंडर भरली. मात्र निकषात बसतनसल्याचे कारण पुढे करून नऊ कंपन्या बाद करण्यात आल्या. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या टेंडरचे तांत्रिक आणि आर्थिक बिड नतपासताच के. बी. बायो ऑर्गनिक प्रा. लि. आणि न्यू एज ऑग्रि. इनोव्हेशन प्रा. लि. या दोन कंपन्यांची टेंडर पात्र ठरवण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्यांचा भागीदार एकच असून त्याचे नाव सचिन बबनराव यादव असे आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्याठाण्याच्या आहेत.

Abdul Sattar
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

पुरवठादाराकडे तांत्रिक उत्पादनासाठी फरिदाबाद येथील केंद्रीय इनसेक्टीसाईड बोर्डाचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट टाकण्यातआली आहे. महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची तुघलकी अट टाकण्यात आली आहे. ज्या दिवशी टेंडर उघडण्यातआली तेव्हा कोणत्याही पुरवठादारास बोलावले गेले नाही. केवळ टेंडर मिळालेल्या दोन पुरवठादारांसमोरच ही टेंडर उघडण्यात आलीआणि त्यांनाच पात्र ठरवण्यात आले. प्रत्यक्षात या दोन्ही पात्र ठरवण्यात आलेल्या पुरवठादारांकडेही संपूर्ण अटी, शर्तींची पूर्तताकरणारी कागदपत्रे नव्हती. ही टेंडर उघडताना टेंडरधारकांना बोलावण्यात आले नाही. मंत्र्याच्या मर्जीतील अधिकारी आणि हितसंबंध जोपासणाऱ्या काहीव्यक्तींसमोर टेंडर अंतिम करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Abdul Sattar
Mumbai-Pune Express Way : 10 वर्षांसाठी CCTV वर 340 कोटींचा खर्च

सेंद्रीय कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात येणाऱ्या टेंडरसाठीच्या अटी, शर्ती अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे ऐनवेळी बदलण्यातआल्याची चर्चा आहे. हे टेंडर प्रत्येक वर्षी नव्याने काढण्यात येते. मात्र हा प्रघात मोडून यंदा प्रथमच दोन वर्षांसाठी टेंडर काढण्यात आले. महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय प्रयोगशाळेत होत नसलेली जीएलपी चाचणी प्रमाणपत्राची अट टेंडरमध्ये टाकण्यात आली. पहिल्यांदा आलेल्या टेंडरमधून कमीत कमी तीन टेंडर नियमाप्रमाणे पात्र ठरवली जातात. मात्र येथे हा नियम काढूनच टाकण्यात आला. टेंडरधारकांची आर्थिक कागदपत्रांची तपासणी आणि त्यांनी दिलेल्या दरांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे कीटकनाशककोणत्या दराने खरेदी केले जाणार याचा कुठेही उल्लेख नाही. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळार्फत सेंद्रीय कीटनकाशक खरेदीचे टेंडर के.बी. बायो-ऑर्गॅनिक प्रा.लि. आणि न्यूएज ऑग्रि. इनोव्हेशन प्रा. लि. या दोन कंपन्यांना मिळाले. या दोन्ही कंपन्यांचा संचालक मात्र एकच आहे. टेंडर पास करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी28 एप्रिल 2023 रोजी विपणन करार केला. या कराराच्या आधारे दोन्ही कंपन्यांनी टेंडर मिळविण्याचा उद्योग केला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com