सोमय्यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा? संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

Sanjay Raut, Kirit Somaiya
Sanjay Raut, Kirit SomaiyaTendernama

मुंबई (Mumbai) : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर घोटाळ्याचा आणखी एक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिले दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
भाजप नेते आशिष शेलारांची कंत्राटदारांना आता थेट 'ईडी'ची धमकी

या घोटाळ्याप्रकरणी मी काय करणार हे कळेल. आज तुम्ही त्या आरोपीला प्रश्न विचारा. इलू इलू क्या है असे आपण म्हणतो ना, तसे टॉयलेट घोटाळा काय आहे, असे त्या आरोपीला विचारा, असे राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला. त्यामुळे त्याला किरीट सोमय्या काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 3000 कोटींचा 'टीडीआर'...

या महाशयाचा मी टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिले देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणे दाखवून हा घोटाळा झाला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलावे. त्यांना भ्रष्टाचाराची फार कणव आहे. त्यांची, भाजपवाल्यांची राष्ट्रभक्ती फार उचंबळून येत असते. त्यामुळे आम्ही काढणार असणाऱ्या टॉयलेट घोटाळ्यावर त्यांनी बोलावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut, Kirit Somaiya
मुंबई एअरपोर्टच्या धर्तीवर 950 कोटींतून साकारणार 19 रेल्वे स्टेशन

100 कोटीच्यावर टॉयलेट घोटाळा झाला. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असेही त्यांनी सांगितले. पाकमध्ये दाऊद बसला आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे बाहेर काढू लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? तो आरोपी आहे. दाऊद इब्राहिमने जसे दहशतवादावर बोलू नये तसे विक्रांत घोटाळा ज्यांनी केला आहे त्यांनी दुसऱ्यांवर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या. विक्रांतचा पैसा कुठे गेला. फडणवीसांनी पवारांवर ट्विटवर ट्विट केले. एखादे ट्विट त्यांनी विक्रांतवर करावे. आम्ही टॉयलेट घोटाळा काढणार आहोत. त्यावर एखादे ट्विट करावे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com