Economy
Economy Tendernama

सावधान! पुढील काही महिन्यांत EMI वाढण्याची शक्यता?

मुंबई (Mumbai) : रिझर्व्ह बँकेकडून (Reserve bank Of India) डिसेंबरपर्यंत व्याजदरात 5.9 टक्क्यांपर्यंतची वाढ केली जाऊ शकते, असे अमेरिकी पतमानांकन संस्था फिच रेटिंगने (Fitch Ratings) म्हटले आहे. देशांतर्गत वाढत चाललेली महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची खराब कामगिरी आदींच्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून व्याजदरात वाढ करू शकते, असा दावा फिचकडून करण्यात आला आहे.

Economy
जमिनी मोजण्याच्या प्रकरणांना गती देण्यासाठी मोठा निर्णय; एवढा निधी

जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थिती, देशांतर्गत महागाईत झालेली वाढ आदींचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. जागतिक पातळीवरील कठोर आर्थिक धोरणाचाही अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे फिचने म्हटले आहे. आरबीआयने रेपो दरांत वाढ केल्यास कर्जे महागणार असून, EMI ही वाढू शकतात.

Economy
'समृद्धी'च्या उद्घाटनासाठी तारिख पे तारिख; वाहतूक मात्र सुसाट

आरबीआयकडून डिसेंबर 2022 पर्यंत व्याजदर 5.9 टक्के आणि 2023च्या अखेरीस 6.15 टक्के केला जाऊ शकतो, असे फिचने म्हटले आहे. 2024 मध्ये व्याजदर स्थिर राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Economy
पुणे महापालिकेचा दणका! दोन ठेकेदार कंपन्या गोत्यात; 3 कोटींचा दंड

जागतिक बॅंकेचाही इशारा

देशातील वाढती महागाई, कोरोनामुळे विस्कळित झालेली पुरवठा साखळी आणि भूराजकीय तणावाचा मोठा फटका देशाच्या आर्थिक वाढीला बसण्याची शक्यता आहे. जागतिक बॅंकेने (World Bank) चालू आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात पुन्हा एकदा कपात करतानाच तो दर ७.५ टक्के एवढा राहील, असे म्हटले आहे. सरकारचा भर भायाभूत सेवांच्या निर्मितीवर राहणार आहे. त्याच बरोबर लॉजिस्टिक क्षेत्रातही मोठे बदल होणार असून, त्याचे आधुनिकीकरण होणार आहे. दुसरीकडे कोरोनामुळे अर्थकारणाला मोठा फटका बसला असून, त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com