पुणे महापालिकेचे ठेकेदारासाठी 'काय पण'; नियमच बसविले धाब्यावर

Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationTendernama

पुणे (Pune) : पाणी पुरवठा, एसटीपी पाठोपाठ पीएमपीएमएलच्या ई-बससाठी पुणे स्टेशन येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यास काढण्यात आलेल्या सुमारे सात कोटी रूपयांच्या टेंडरमध्येही घोळ असल्याचे समोर आले आहे. विशिष्ट ठेकेदारालाच हे काम मिळावे, यासाठी विद्युत खात्याने नियम धाब्यावर बसविले असल्याचे टेंडरच्या कागदपत्रावरून समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त यामध्ये लक्ष घालणार का? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

Pune Municipal Corporation
दुबईच्या धर्तीवर मुंबई फिल्मसिटीचा विकास; 'रिलायन्स'ला का नाकारले?

पीएमपीएमएलच्या बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेकडून दोन टेंडर काढण्यात आले. त्यापैकी लोहगाव येथील चार्जिंग स्टेशनसाठी केबल टाकण्याची एक टेंडर हे ४ कोटी ६३ लाख रूपयांचे आहे. तर दुसरे टेंडर ७ कोटी २८ लाख रूपयांची आहे. दोन्ही कामे एकाच प्रकारची आहेत. फरक फक्त चार्जिंग स्टेशनपर्यंत केबल (उच्चदाब वाहिनी) टाकण्यातील अंतराचा आहे. परंतु या दोन्ही टेंडरमध्ये केबलचा दर आणि त्यासाठी करावी लागणारी खोदाई यांच्यासाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या दरात मोठा फरक असल्याचे सकाळच्या हाती लागलेल्या कागदपत्रावरून समोर आले आहे. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

Pune Municipal Corporation
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे काम वेगाने; 'इतका' खर्च

वास्तविक अशा कामांसाठी कोणत्या प्रकाराची केबल वापरावी. त्या केबलचे दर काय आहेत, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्लूडी) आणि महावितरणच्या डीएसआरमध्ये दिले आहे. एवढेच नव्हे, तर महापालिकेचे सुद्धा डीएसआर रेट आहेत. असे असताना केवळ ठेकेदाराच्या हितासाठी विद्युत खात्याने स्वत:च्या मनाप्रमाणे टेंडरमध्ये केबलचे रेट देऊन इस्टीमेट तयार केले असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

Pune Municipal Corporation
मुंबई-पुणे आणखी सुपरफास्ट; चिरले ते खालापूर रस्त्यासाठी सल्लागार

नियमानुसार उच्चदाब वाहिनी असल्यामुळे ती राऊंड आर्मर्ड असावी, असा नियम आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि महावितरणाच्या डीएसआरमध्ये तीचा दर हा २ हजार ९७० एवढा आहे. महापालिकेच्या टेंडरमध्ये हाच दर केवळ १ हजार ६८१ असा धरण्यात आला आहे. केबलवर अर्धे अवरण असलेला पाइप टाकण्यासाठी एक टेंडर ५८ रूपये आणि खोदाईसाठी वेगळा असे धरून २२६ रूपये तर दुसऱ्या टेंडरमध्ये हाच दर ४४६ रूपये असा धरण्यात आला आहे. एवढा फरक का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्युत विभागाने अशा प्रकारे यापूर्वी केलेल्या उच्चदाबाच्या केबल टाकण्याच्या सर्वच कामांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Pune Municipal Corporation
पुणे महापालिकेचा निवडणुकीच्या तोंडावर आणखी दोन रुग्णालयांचा घाट

कशासाठी हा घोळ
टेंडर मागविल्यानंतर नियमानुसार इस्टिमेटपेक्षा (पूर्वगणपत्रक) दराने टेंडर आले, तर जेवढ्या कमी दराने टेंडर येईल, तेवढ्या दराचे परफॉमन्स डिपॉझिट संबंधित ठेकेदाराला महापालिकेत भरावे लागते. कारण अपूर्ण काम करून ठेकेदार पळून गेला, तर महापालिका हे डिपॉझिट जप्त करून भरपाई करू शकते. परंतु मर्जीतील ठेकेदाराचे हे पैसे वाचावेत, यासाठी केबलचे दर नियमापेक्षा कमी धरण्यात आले आहे. जेणेकरून ठेकेदार जादा दराने टेंडर भरावे आणि त्यालाच काम मिळावे, हा हेतू त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे.

टेंडरवरून निर्माण झालेले प्रश्‍न
- एकाच कामासाठी केबलचे सोईनुसार दर
- हाफ राउंड पाईपचे दर ५८ रूपये कुठून आला
- खोदाई शुल्कात तफावत
- परफॉमन्स डिपॉझिट वाचविण्याचा प्रयत्न
२२ केव्ही ३०० स्वेकअर एमएमच्या केबलचा दर ११ केव्ही ३०० स्वेकअर एमएमच्या केबल पेक्षा कमी कसा टेंडरमध्ये राउंड आर्मर्ड केबलचा उल्लेख जाणीवपूर्वक नाही

पीएमपीएमलच्या बस चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. त्यामध्ये अशा काही चुका असतील, तर त्या तपासून घेऊन दुरूस्त करण्याचे आदेश देण्यात येईल.
- कुणाल खेमणार (अतिरिक्त आयुक्त)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com