Pune Airport : Good News! पुणे विमानतळ यंदा करणार 'हा' नवा विक्रम?

Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : मागचे वर्ष पुणे विमानतळासाठी (Pune Airport) चांगले गेले. गेल्या वर्षात ८० लाखाहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. कोरोनापूर्वी जी स्थिती होती, ती स्थिती गाठण्यात यश आले आहे. चालू आर्थिक वर्षात प्रवासी आकडा ९० लाखांच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे.

प्रवासी संख्या वाढल्याने विमानांची वाहतूक देखील वाढली. मागच्या वर्षात ५९ हजार ४५१ विमानांची ये-जा पुणे विमानतळावर राहिली आहे. यातून पुणे विमानतळाला सुमारे १४८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. व्यस्त विमानतळांमध्ये पुणे नवव्या स्थानी आहे.

Pune Airport
Nashik : सिन्नर MIDC होणार नाशिकमधील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत; एकरी 52 लाखांचा दर

पुणे विमानतळावर गेल्या वर्षभरात एक हजाराहून अधिक विमानांचे उड्डाण रद्द झाले. तरी देखील विमान वाहतुकीचे प्रमाण जास्त राहिले आहे. कोरोनापूर्वी पुणे विमानतळावरून २०१९-२० या वर्षी ८० लाख ८५ हजार ६०७ प्रवाशांनी प्रवास केला. तर २०२२-२३च्या आर्थिक वर्षात ८० लाख सात हजार १६० प्रवाशांनी प्रवास केला. एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान ७१ लाख २४ हजार १५१ प्रवाशांनी प्रवास केला.

चालू आर्थिक वर्ष हे ३१ मार्चला संपेल. तत्पूर्वी पुणे विमानतळावरून आणखी सुमारे २० लाख प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील प्रवाशांची संख्या ९० लाखांच्या पुढे जाईल.

Pune Airport
Nashik : 'समृद्धी' लगतच्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी! MSRDCने देणार 49 कोटी

आकडे काय सांगतात?

वर्ष प्रवासी संख्या

२०१९-२० ८० लाख ८५ हजार ६०७

२०२०-२१ २१ लाख ३७ हजार ८५९

२०२१-२२ ३७ लाख २८ हजार ७६०

२०२२-२३ ८० लाख ७ हजार १६०

२०२३ (३१ डिसेंबर अखेर ) ७१ लाख २४ हजार १५१

विमानांची वाहतूक

वर्ष विमानांची संख्या

२०१९-२० ५४ हजार २६१

२०२०-२१ ३० हजार

२०२१- २२ ३१ हजार २७८

२०२२-२३ ५९ हजार ४५१

२०२३ (३१ डिसेंबर) ४७ हजार ६४०

व्यस्त विमानतळ (आकडे प्रवासी संख्या)

- दिल्ली : ७.१७ कोटी

- मुंबई : ५.१२ कोटी

- बंगळूर : ३.७० कोटी

- हैदराबाद : २.४१ कोटी

- चेन्नई : २.०८ कोटी

- कोलकत्ता : १.९४ कोटी

- अहमदाबाद : १. १७ कोटी

- कोची : १ कोटी

- पुणे : ८० लाख

- गोवा : ७३.९८ लाख

- लखनौ : ६०.५६ लाख

- गुवाहाटी : ५८.१७ लाख

- जयपूर : ५३.८४ लाख

Pune Airport
Sambhajinagar : संभाजीनगरकरांना रेल्वेने दिली Good News! पुढील 30 महिन्यांत...

कोरोनापूर्वीची जी प्रवासी संख्या होती, त्या संख्येजवळ पोचलो आहोत. २०२४ मध्ये ९० लाखांच्या पुढे जाऊ अशी आशा आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर प्रवासी व विमानांच्या संख्येत आणखी वाढ होईल.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com