पनवेल ते कर्जत थेट लोकल; २ हजार ७८३ कोटींचा खर्च

Local

Local

Tendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे-दिवा (Thane-Diva) दरम्यान नव्या पाचव्या सहाव्या मार्गिका सुरू झाल्यानंतर आता काही वर्षात पनवेल ते कर्जत अशा थेट लोकल गाड्या सुरू होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. एमयुटीपी ३ मधील पनवेल-कर्जत या नवीन ५६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गासाठी ७४ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिली. तर उर्वरित जागेचा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पनवेल ते कर्जत मार्गावर थेट लाेकल धावणार आहेत. पनवेल-कर्जत दरम्यान ५६ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला २ हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे.

Local

EXCLUSIVE : मुंबई म्हाडा सभापतीपदावरुन राष्ट्रवादीत घमासान

पनवेल ते कर्जत एकच रेल्वे मार्ग असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, त्यात बराच वेळ जातो. याशिवाय या मार्गावरुन उपनगरीय रेल्वे वाहतूक होत नसल्याने किंवा अन्य शटल सेवाही नसल्याचा फटका येथील प्रवाशांना होत होता. त्यामुळे प्रवाशांचा सुविधेसाठी २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती.

Local

नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठी 'इतक्या' हजार कोटींचे बजेट

काेरोनामुळे या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली होती. दुहेरी मार्ग २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. प्रकल्पातील दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी सरकारी, खासगी आणि वन अशी १३५.८९३ हेक्टर जमीन आवश्यक आहे. यातील १०१.०९० हेक्टर म्हणजेच ७४.३९ टक्के भूसंपादन झाले असून २५.६१ टक्के भूसंपादन शिल्लक आहे. या प्रकल्पात पादचारी पुलांसह अन्य काही कामांना सुरुवात झाली आहे. या मार्गात तीन बोगदेही असून त्यासाठी टेंडरही काढली आहे. यातील एक बोगदा २.६० किलोमीटर लांबीचा असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.

Local

४५० कोटीत मुंबई-दिल्ली अंतर कसे कमी होणार?

रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये
या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेल ते कर्जतदरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रकल्पात पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. ३.१२ किलोमीटरचे तीन रेल्वे बोगदे असणार आहेत. तर या ५६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर रस्ते पाच उड्डाणपूल, दोन रेल्वे उड्डाणपूल, सहा मुख्य पूल आणि ३७ लहान पूल असणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com