Kumbh Mela Infrastructure: मागील सिंहस्थाच्या तुलनेत पाचपट भाविक येणार! नव्या 12 घाटांची...

सिंहस्थानिमित्त गोदावरीकाठी 507 कोटींचे 12 नवीन घाट उभारणार
Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Simhastha Maha Kumbh Mela, nashikTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठावर ५०७ कोटी रुपये निधीतून आणखी नवीन १२ नवीन घाट उभारण्यात येत आहेत. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीतीरावरील घाटांची लांबी नऊ किलोमीटर होणार आहे.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Simhastha Mahakumbh Nashik : सिंहस्थातील आणखी 4100 कोटींच्या कामांना मान्यता

घाटांची वाढती संख्या व त्यांची वाढलेली लांबी यामुळे सिंहस्थकाळात भाविकांसाठी स्नान व धार्मिक विधींसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे मागील सिंहस्थाच्या तुलनेत काहीपट भाविक आले, तरी त्यांच्या गर्दीचे विकेंद्रीकरण करता येणार आहे. या घाटांची कामे नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Nashik Kumbh Mela: सिंहस्थातील 23 हजार कोटींच्या कामांपैकी 12 हजार कोटींच्या कामांना भूसंपादनाचा अडसर

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मागील सिंहस्थाच्या तुलनेत पाचपट भाविक येण्याचा अंदाज बांधून कुंभमेळा प्राधिकरणकडून पायाभूत सुविधांचे नियोजन केले गेले आहे. सिंहस्थात गोदावरीत स्नानाला अधिक महत्व असल्याने मोठ्यासंख्येने येणा-या भाविकांसाठी नाशिक शहरातील घाटांची संख्या सध्या असलेल्या १० घाटांवरून २० पर्यंत वाढवण्यात येणार असून, सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या गोदावरी किनाऱ्यावर ही विस्तारयोजना राबवली जात आहे.

यासाठी प्रामुख्याने कपिला संगम, नंदिनी संगम, टाकळी संगम ब्रिज, टाकळी संगम, नांदूर दसक डावा काठ, नांदूर दसक उजवा काठ, ओढा, सोमेश्वर धबधबा, नवश्या गणपती आणि लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी १० नवीन घाट बांधण्यात येणार असून त्यामुळे घाटांची लांबी ३.४५१ मीटरने वाढणार आहे. या दहा नवीन घाटांसाठी ३६१.२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Nashik Airport: ओझर विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय दिली गुड न्यूज?

त्र्यंबकेश्वरला दोन घाट

त्र्यंबकेश्वर येथे १३ पैकी १० आखाडे शाहीस्नान करतात. मात्र, तेथे कुशावर्त तीर्थात दाट लोकवस्तीच्या मध्यभागी असल्याने तेथे भाविकांना स्नान करण्यास मर्यादा येतात व प्रशासनावरही ताण येतो. यामुळे त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या डाव्या व उजव्या काठावर प्रत्येकी एक असे दोन नवीन घाट उभारले जात असून, एकूण ३,१४० मीटर लांबीची वाढ होणार आहे. जलसंपदा विभागामार्फत सुमारे १४६.१० कोटी रुपये खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
 
घाटांवर मूलभूत सुविधा
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर घाटांची रचना करताना गर्दी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक घाटासाठी निश्चित क्षमता, पोलिस चौक्या, वॉचटॉवर्स, स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, आपत्कालीन सेवा मार्ग आणि पार्किंगशी जोडणी यांचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय वस्रांतरगृहे, स्वच्छतागृहे आणि प्रकाशव्यवस्था ही मूलभूत सुविधा म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सर्व घाटांसाठी एकसंध नामांकन आणि सीमांकन प्रणाली विकसित केली जात असून, कुंभमेळ्यादरम्यान विव-िध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.

Simhastha Maha Kumbh Mela, nashik
Nashik: सिंहस्थापूर्वी नाशिकमध्ये आणखी एक आठपदरी रस्ता मंजुरीच्या टप्प्यात

घाट हेच सिंहस्थाचे केंद्रबिंदू आहेत. रस्ते, पार्किंग, आरोग्य सुविधा यांसारखी इतर सर्व पायाभूत व्यवस्था भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्यांचे आधुनिकीकरण करून सिंहस्थ २०२७च्या प्रमाणाला साजेशी व्यवस्था उभारण्यात येत आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

असे आहेत घाट...
नाशिक
१० नवीन घाट -१०
वाढीव लांबी  ३.४५१ किलोमीटर
खर्च – ३६१.२६ कोटी रुपये
त्र्यंबकेश्वर
नवीन घाट- २
वाढीव लांबी - ३.१४० किलोमीटर
खर्च - १४६.१० कोटी रुपये
नवीन घाटांची एकूण लांबी : ६.५९१ किलोमीटर

नाशिक प्रस्तावित घाट
 कपिला संगम घाट- ४०० मीटर
 नंदिनी संगम घाट- २७५ मीटर
 टाकळी संगम ब्रिज घाट- ४०० मीटर
 टाकळी संगम घाट- ३०० मीटर
 नांदूर दसक डावा काठ- ५०० मीटर
 नांदूर दसक उजवा काठ- ५७० मीटर
 ओढा घाट- २५५ मीटर
 सोमेश्वर धबधबा घाट- १७४ मीटर
 नवश्या गणपती घाट- १६७ मीटर
 लक्ष्मीनारायण घाट- ४१० मीटर

त्र्यंबकेश्वर प्रस्तावित घाट
 डावा काठ - १,६१४ मीटर
 उजवा काठ- १,५२६ मीटर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com