Nashik : स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत 'या' कारणांमुळे नाशिक मागे पडतेय का?

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ शहरांसाठी घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नाशिक शहराच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. मागील दोन वर्षे या क्रमवारीत घसरण झाली असताना २०२३ च्या स्पर्धेत ७५ व्या स्थानावरून ३९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच देशातील १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या (मिलियन प्लस सिटी) शहरांमध्ये २० व्या क्रमांकावरून १६ वे स्थान पटकावले आहे. मात्र, शहरातील मलनि:स्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण तसेच क्षमतावृद्धी केलेली नसल्याने मलजल थेट गोदापात्रात मिसळले जात असल्याने नाशिक या स्पर्धेत पहिल्या दहा शहरांमध्ये येऊ शकले नसल्याचेही समोर आले आहे.

Nashik
Pune Airport : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पाहताच ज्योतिरादित्य शिंदेंचा का चढला पारा?

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाकडून घेतलेल्या जात असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत स्वच्छता व पर्यावरण या बाबींशी निगडित अनेक घटकांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असणारे सर्व निकष पूर्ण करीत असल्याबाबत त्रयस्थ यंत्रणेद्वारे पाहणी केली जाते. त्यातून देशातील सर्वोत्कृष्ट शहरांची निवड केली जाते.

स्पर्धेत नाशिक महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशातील १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या (मिलियन प्लस सिटी) शहरांमध्ये २० व्या क्रमांकावरून १६ व्या स्थानी येत कामगिरी उंचावली आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्व लोकसंख्येच्या शहरांमध्ये (४४७० शहरे) ७५ व्या स्थानावरून ३९ व्या स्थानी झेप घेतली आहे. स्पर्धेत जीएफसी सर्टिफिकेशन या घटकांत महापालिकेने थ्री स्टार मानांकन मिळवले. मागील सर्वेक्षणात महापालिकेने १ स्टारवर समाधानकारक कामगिरी उंचावली आहे. त्याचप्रमाणे वॉटप प्लस सर्टिफिकेशन या घटकांत महापालिकेने ओडीएफ डबल प्लस दर्जा कायम ठेवला.

Nashik
Nashik : येवल्यासाठी छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज! 'या' कामांसाठी तब्बल 10 कोटींचा...

महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देखील सहभाग नोंदविला असून देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे. या स्पर्धेत नाशिक शहर पहिल्या दहा क्रमांकामध्ये येण्यात प्रामुख्याने मलनि:स्सारण केंद्रांचा दर्जा आधुनिक नसणे, त्यांची क्षमता कमी असणे व ३० पेक्षा अधिक बीओडी असलेले मलजल थेट गोदापात्रात सोडणे ही कारणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे पुढील वर्षी या स्पर्धेतील कामगिरी सुधारण्यासाठ महापालिकेने मलनि:स्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमतावाढीचे काम अमृत दोन योजनेऐवजी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नमामि गोदा प्रकल्पातून करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २७८० कोटींचा सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या सध्याच्या मलनि:स्सारण केंद्रांची क्षमता वाढवण्यासह मलवाहिकांचे नवीन जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनि:स्सारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनि:स्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी मलजलवाहिकांचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरीच्या घाटांचे नूतनीकरण व नवीन घाट बांधणे, औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. ही कामे झाल्यानंतर नाशिक शहराचा  देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचा समावेश होऊ शकतो, असे प्रशासनाला वाटते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com