Narendra Modi : मोदीजी काहीही करा पण थोडा वेळ काढा! पुणेकर का बघताहेत पंतप्रधानांची वाट?

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. दुसरीकडे जास्त क्षमता असलेले नवे टर्मिनल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जुन्या टर्मिनलवरील प्रवाशांचे प्रमाण क्षमतेच्या तुलनेत २८ टक्के वाढल्याने सुविधांवर परिणाम होत आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे नव्या टर्मिनलचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी जोर धरीत आहे. (Pune Airport New Terminal - PM Narendra Modi)

Pune
Nashik : मजूरसंस्था, सुशिक्षित बेरोजगार यांना विनाटेंडर 15 लाखांची कामे मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन व्हावे असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र त्यामुळे उद्घाटन सतत लांबणीवर पडत आहे. नव्या टर्मिनलचे काम पूर्ण होऊन सुमारे पाच महिने उलटले आहेत. दरम्यानच्या कालावधीत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नव्या टर्मिनलची पाहणी केली.

उद्घाटन लवकर व्हावे म्हणून शहर काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. खासदार प्रियांका चतुर्वेदी व वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला, मात्र उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही.

Pune
काँग्रेसच्या दोन आमदारांचा टक्केवारीचा वाद प्रदेशाध्यक्षांकडे; 35 कोटींच्या निधीसाठी घेतले...

नव्या टर्मिलनलचे फायदे

- प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी सेन्सरचा वापर

- प्रवाशांच्या बॅगेज चेकिंगचा वेळ वाचावा म्हणून नव्या ‘इन लाइन बॅगेज’ प्रणालीचा वापर. यामुळे प्रवाशांना रांग लावण्याची गरज नाही

- नव्या प्रणालीमुळे बॅग ‘एक्स रे मशिन’मधून काउंटरच्या बेल्टपर्यंत नेण्याची गरज नाही. हे काम यांत्रिक पद्धतीने होईल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होणार

जुन्या टर्मिनलच्या समस्या

- प्रवासी वहन क्षमता वर्षाला ७१ लाख, २०२३ मध्ये ९० लाख प्रवाशांची वाहतूक

- प्रवासी संख्या वाढल्याने टर्मिनलमध्ये बसण्यापासून ‘चेक इन काउंटर’पर्यंतच्या यंत्रणेवर ताण

- स्वछतागृह लवकर उपलब्ध न होणे, टर्मिनलमध्ये अस्वछता

Pune
Malegaon : मालेगाव महापालिकेचे घंटागाडीचे 75 कोटींचे टेंडर का सापडले वादात?

नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे, मात्र उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. तारखेबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होईल. सध्याच्या तुलनेत प्रवाशांची संख्या आणखी वाढेल. विमानांना उशीर झाल्यास किंवा एखादे विमान रद्द झाल्यास प्रवाशांना टर्मिनलमध्ये ताटकळत बसावे लागेल. प्रवासी संख्या वाढल्यास सुविधांवर त्याचा परिणाम होईल. पर्यायाने प्रवाशांची गैरसोय होईल. त्यामुळे नव्या टर्मिनलचे उद्घाटन तत्काळ होणे गरजेचे आहे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

नवे टर्मिनल तयार होऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. जुन्या टर्मिनलवर सुविधांची वानवा असल्याने प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसेल तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करावे, मात्र पुणेकरांची अडवणूक होता कामा नये.

- मोहन जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com