राज्याच्या उपराजधानीला मिळणार नवे विधानभवन! काय आहे सरकारचा प्लॅन?

Vidhanbhavan Nagpur: नागपूरमधील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्याचे संकुल उभारण्यात येणार
Nagpur Vidhanbhavan
Nagpur VidhanbhavanTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे व्हावे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

Nagpur Vidhanbhavan
Exclusive: राज्यातील कंत्राटदारांमध्ये का उडाली खळबळ? कोट्यवधींचे बनावट GR उजेडात

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी उपस्थित होते. वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

नागपूरमधील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्याचे संकुल उभारण्यात येणार असून हे विस्तारीकरण करताना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहिल याची काळजी घेण्यात येणार आहे.

Nagpur Vidhanbhavan
Exclusive: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच 'सामाजिक न्याय'कडून वाटाण्याच्या अक्षता!

विस्तारीकरणामध्ये एकाच इमारतीत सेंट्रल हॉल, विधानसभा, विधानपरिषद सभागृह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, विरोधी पक्ष नेते यांचे दालन आदी असणार आहेत. तर शेजारीच मंत्रिमंडळ सदस्यांसाठी वेगळी सहा मजल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच वाहनतळ, उपहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा कक्ष आदी सुविधा असणार आहेत.

तसेच शासकीय मुद्रणालयाची जागा विधिमंडळास मिळाली असून, या जागेवर मंत्रालयीन प्रशासकीय कार्यालयांसाठी सुमारे चार लाख चौ. फुटांची चौदा मजली भव्य दिव्य अशी इमारत उभारण्यात येणार आहे. विधानभवन परिसर व प्रस्तावित प्रशासकीय इमारत यांना भुयारी टनेलने जोडण्यात येणार आहे.

Nagpur Vidhanbhavan
Pune: जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले; कारण काय?

नागपूरमधील विधानभवनाच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाच्या मार्फत करण्यात येणार आहे. महामंडळाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी यावेळी दिले.

विधानभवनाचे विस्तारीकरण व नवीन इमारत बांधताना हरित इमारतीची संकल्पना राबविण्यात यावी. विधानभवनाच्या प्रस्तावित विस्तारीकरणामध्ये अभ्यांगतांसाठी पुरेशी जागा तसेच उपहारगृहाची सोय असावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com