Raymond चा रिअल इस्टेटमध्ये प्रवेश
gautam singhania, Raymond Realty Tendernama

Mumbai Redevelopment: मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांबाबत काय म्हणाले Raymond Realty चे गौतम सिंघानिया?

रेमंड रिअल्टीकडून फक्त फायदेशीर प्रकल्पांनाच प्राधान्य दिले जाणार, गौतम सिंघानियांनी कोणावर ओढले ताशेरे, Raymond Realty चा IPO 1 जुलैला
Published on

मुंबई (Mumbai Redevelopment News): सध्या मुंबईत पुनर्विकास (Redevelopment) प्रकल्पांची चांगलीच चलती असली तरी Raymond Realty या प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनीला त्या स्पर्धेत धावण्यात कुठलाही रस नाही, असा स्पष्ट इशारा Raymond Group चे अध्यक्ष गौतम सिंघानिया  यांनी दिला. कोणताही प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसेल, तर आम्ही त्यातून माघार घेण्यास मागे पुढे पाहणार नाही अशा स्पष्ट शब्दांत सिंघानिया यांनी कंपनीची दिशा सांगितली.

Raymond चा रिअल इस्टेटमध्ये प्रवेश
Jayant Patil : राज्याची महसूली तूट दोन लाख कोटींपर्यंत पोहोचणार

विकसकांकडून ऑफर्सचा पाऊस

गेल्या काही काळात मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांसाठी विकसकांकडून भरघोस ऑफर्स दिल्या जात असून, अशा सौद्यांमध्ये 'शेअर बाजारातील मुल्यवृद्धी'पेक्षा नफा (Profit Margins) महत्त्वाचा असल्याचे सिंघानिया म्हणाले. "आमच्याकडे कठोर आर्थिक शिस्त आहे. एखादा व्यवहार आमच्या आर्थिक निकषांनुसार नसेल, तर मी त्यातून माघार घेण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही. सध्या काही व्यवहार इतके महाग आहेत की त्यातून कोणीही नफा मिळवू शकणार नाही," असे ते म्हणाले.

Raymond चा रिअल इस्टेटमध्ये प्रवेश
Mumbai MHADA: मुंबईतील 'त्या' 25 इमारतींच्या पुनर्विकासाचा लवकरच श्रीगणेशा

Raymond Realty Listing आणि विकास योजना

रेमंड रिअल्टी 1 जुलै रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध (Raymond Realty Listing on July 1) झाली. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, रेमंड रिअल्टीचे व्यवस्थापकीय संचालक व CEO हरमोहन सहनी यांनी सांगितले की कंपनी फक्त 20% हून अधिक नफा देणाऱ्या प्रकल्पांमध्येच गुंतवणूक करणार आहे.

त्यांनी सांगितले की कंपनीकडे ठाण्यातील जे.के. ग्राम परिसरात 100 एकर जमीन असून त्यावर 11.5 मिलियन चौरस फूट विकासक्षमता आहे. यापैकी 4.5 मिलियन चौरस फूट प्रकल्प सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससह विविध ठिकाणी सहा पुनर्विकास करार झाले असून, इतर उपनगरांतही चर्चा सुरू आहे.

Raymond चा रिअल इस्टेटमध्ये प्रवेश
चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु; 154 कोटींच्या कामांना स्थापत्य सल्लागार नियुक्ती लवकरच

कंपनीचे उद्दिष्ट आणि आर्थिक मूल्यांकन

रेमंड रिअल्टी दरवर्षी २० टक्क्यांनी आपली उलाढाल वाढवण्याच्या उद्दिष्टाने काम करत आहे. तसेच दरवर्षी ₹10,000 कोटींहून अधिक Gross Development Value (GDV) असलेले प्रकल्प पोर्टफोलिओमध्ये जोडण्याचा मानस आहे.

रेमंड रिअल्टीचे मूल्यांकन सध्या अंदाजे ₹8,000 कोटी ते ₹12,000 कोटींच्या दरम्यान असून, त्यामुळे Raymond Group चे एकूण मार्केट कॅप ₹20,000 कोटींच्या आसपास पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Raymond चा रिअल इस्टेटमध्ये प्रवेश
तुमच्या गृहनिर्माण संस्थेच्या Redevelopment चा विचार करताय; मग ही बातमी वाचाच!

शंभराव्या वर्षात Raymond 2.0

रेमंडच्या स्थापनेच्या 100व्या वर्षात, ग्रुपने Raymond 2.0 Transformation Plan अंतर्गत आपल्या व्यवसायाचे विभाजन केले आहे – वस्त्र व्यवसाय (Apparel), रिअल इस्टेट (Real Estate), आणि अभियांत्रिकी-डिफेन्स (Engineering - Defense) या स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि भागधारकांना विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता येईल आणि मूल्यवृद्धीस चालना मिळेल.

Tendernama
www.tendernama.com