मुंबई आणखी सुसाट! कोस्टल रोड-वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार

Coastal Road
Coastal RoadTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट करण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) कोस्टल रोड (Costal Road) वांद्रे-वरळी सी लिंकला (Warali Bandra Sea Link) जोडणार आहे. त्यासाठी 16 किंवा 17 एप्रिल रोजी 120 मीटरपर्यंत गर्डर लाँच करण्याची शक्यता आहे.

Coastal Road
Mumbai : 700 एसी डबलडेकर ई-बसेसचा पुरवठा करण्यास 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीचा नकार?

अडीच हजार टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा हा गर्डर बसवण्यात येणार आहे. यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूने वांद्रे-वरळी सी लिंक जोडला जाणार आहे. यासंदर्भात कोस्टल रोडचे उपमुख्य अभियंता एम.एम. स्वामी यांनी माहिती दिली, 46 मीटर, 44 मीटर आणि 60 मीटरचे तीन गर्डर याआधीच पुलाच्या बांधणीसाठी लाँच करण्यात आले आहेत. 12 एप्रिल रोजी न्हावा गावाच्या जेट्टीवर 120 मीटरच्या बो स्ट्रिंग पुलाची कमान बार्जमध्ये लोड करण्यात येईल. त्यानंतर वरळीच्या दिशेने ही बार्ज मार्गस्थ होईल. साधारण 15-16 तारखेपर्यंत वरळीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीनुसार, 16 किंवा 17 एप्रिलला हा गर्डर लाँच केला जाईल.

Coastal Road
'त्या' भीतीपोटी 'तिसऱ्या मुंबई'ला विरोध; 25 हजारांहून हरकती

कोस्टल रोडचे वरळीचे टोक आणि दक्षिणेकडील सी लिंक व उत्तरेकडील बाजूची कमान हे अंतर भरुन काढण्यासाठी आठ गर्डर लाँच करण्यात आले आहेत. कोस्टल रोड आणि सी लिंक या दरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर 850 मीटर रुंद आणि 270 मीटर रुंद असे असून पुलासाठी वापरला जाणारा धातू हा स्टीलचा असणार आहे. पुलाच्या एकूण गर्डरपैकी चार गर्डर याआधीच लाँच करण्यात आले आहेत. तर, दोन गर्डर न्हावा शेवा बंदरावरती तयार असून एप्रिलमध्ये लाँच करण्यात येतील. वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी अडीच हजार टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा हा गर्डर बसवण्यात येणार आहे. यामुळे 120 मीटरचे अंतर जोडले जाणार असून एका बाजूच्या दोन लेन तयार होणार आहेत, असेही स्वामी यांनी सांगितले आहे. वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्याच्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. ही वाहने सी-लिंक ते कोस्टल रोड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com