Mumbai
MumbaiTendernama

मुंबईत रस्त्यांच्या कामांवर घारीची नजर; क्यूआर कोडद्वारे कामांची..

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते कॉंक्रिटीकरणाचे उद्धिष्ट ठेवले आहे. त्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेला लवकरच सुरूवात होईल. रस्त्याच्या कामांवर देखरेख ठेवणे तसेच चुकीचे प्रकार टाळण्यासाठी रस्ते विभाग सीसीटीव्हीचा वापर करणार आहे. तसेच क्यू आर कोडद्वारे रस्त्यांच्या कामांची माहिती मुंबईकरांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यात रस्ते प्रकल्पाचा कंत्रादार कोण आहे, काम कधी सुरु झाले, पूर्ण होण्याचा कालावधी किती आहे यासोबत प्रकल्पाचा सविस्तर तपशील उपलब्ध असणार आहे.

Mumbai
'या' निर्णयामुळे तरी सुटणार का कात्रज-कोंढवा रुंदीकरणाचा प्रश्न?

मुंबई महापालिकेच्या रस्त्यांशी संबंधित सुरू असणाऱ्या कामांच्या नेमक्या माहितीसाठी येत्या काही दिवसांमध्ये रस्ते विभागाकडून तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून एखाद्या प्रकल्पाशी संबंधित माहिती मिळणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेकडून चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी बारकोडिंग करण्यात येईल. बारकोडिंगवर प्रकल्पाच्या तपशीलासह सर्व महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख असलेला क्यू आर कोड छापण्यात येणार आहे. त्यासोबतच नागरिकांच्या माहितीसाठी गुगल मॅपद्वारे रस्ते बंद तसेच रस्ता वळवणे यासारखी माहितीही मुंबईकरांना येत्या काळात उपलब्ध होणार आहे. एकूणच मुंबई महापालिकेच्या रस्त्याच्या कामाशी संबंधित तपशील येत्या काळात मुंबईकरांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध होईल.

Mumbai
मुंबईतील रस्त्यांचे टेंडर 'या'च कंपन्यांना द्या; कोणी केली मागणी?

मुंबईत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये देखरेख ठेवणे तसेच चुकीचे प्रकार टाळण्यापासून रोखणे यासाठी रस्ते विभाग सीसीटीव्हीचाही वापर करणार आहे. त्यामध्ये रस्त्यावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळा डेटा हा आपत्कालीन व्यवस्था कक्षाला उपलब्ध होईल. त्यासोबतच देखरेखीसाठी हा डेटा प्रमुख अभियंता (रस्ते) आणि उप प्रमुख अभियंता रस्ते यांच्या कक्षालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळेच मुंबईत सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणे महापालिकेच्या टीमला शक्य होईल. तसेच रस्त्याच्या कामातील गैरप्रकारही टाळता येईल, असा महापालिकेा उद्देश आहे.

Mumbai
मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण; कुठे भेगा, कुठे...

मुंबई महापालिका क्षेत्रात ४०० किमीचे कॉंक्रिटचे रस्ते येत्या दिवसांमध्ये तयार करण्याचे उद्धिष्ट महानगरपालिकेने प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये शहर विभागातील ५० किलोमीटरच्या रस्त्यांना ८०० कोटी रूपयांचा खर्च प्रस्तावित आहे. पूर्व उपनगरात ७५ किमीच्या रस्त्यासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर पश्चिम उपनगरात २७५ किमीच्या रस्त्यासाठी ३५०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या २८ जुलैपासून या रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबईत २०२३-२४ मध्ये एकूण ४२३ किमी अंतराच्या रस्त्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

रस्ते प्रकल्पाचा कंत्रादार, काम सुरू आणि पूर्ण होण्याचा कालावधी तसेच प्रकल्पाचा सविस्तर तपशील हा क्वीक रिस्पॉन्स कोडच्या माध्यमातून उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच क्यू आर कोडचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक १०० मीटरवर एक सीसीटीव्ही लावण्याचा मानस आहे. त्यामुळे सुरू असलेल्या कामाची देखरेख करणे या कॅमेऱ्याच्या मदतीने शक्य होईल.
- उल्हास महाले, उपायुक्त, पायाभूत सुविधा, मुंबई महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com