मुंबई महापालिकेची दंड ठोठावलेल्या ठेकेदारावर 300 कोटींची खैरात

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाला तपासात भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यासाठी दंड ठोठावण्यात आलेल्या ठेकेदारालाच कोविडमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले होते, अशी माहिती उघड आली आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

BMC
Mumbai: देशात प्रथम महाराष्ट्राने करून दाखवले! 8,500 कोटींच्या...

ईडीने गेल्या आठवड्यात कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संबंधित मुंबई, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील सुमारे 10 ठेकेदारांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. ईडीने ज्या ठेकेदारांवर छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील कंत्राटदार रोमीन छेडा यांचा समावेश आहे. छेडा यांना कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे टेंडर देण्यात आले होते, त्यांना मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे.

BMC
Eknath Shinde: पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांत राज्य पहिल्या स्थानी

महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) छापेमारी करण्यात आलेल्या सरकारी ठेकेदारांची नावे समोर आली आहेत. रोमीन छेडा, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल अशी ठेकेदारांची नावे आहेत. महापालिकेच्या कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या ठेकेदारांच्या घरावर आणि कार्यालयांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान अशा एकूण 10 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. छापे टाकण्यात आलेली ठिकाणे ही कोविडच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेला सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांशी संबंधित होती. छापेमारी दरम्यान आरोप असलेल्या ठेकेदारांकडून कोट्यवधींची रोख रक्कम आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

BMC
Sambhajinagar: 'त्या' रेखांकनातील TDR आणि बांधकाम परवाना अखेर रद्द

ज्या ठेकेदारांवर ईडीने छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे टेंडर देण्यात आले होते. त्यांना महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे. छेडा याने यूपी-स्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत हे काम करून घेतल्याचा संशय आहे आणि कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे 300 कोटी रुपये दिले गेले होते, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. निकृष्ट उपकरणे पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कंत्राटदाराच्या फायलींवर महापालिका अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असेही सूत्रांनी सांगितले. रोमीन छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे, जी कंपनी यूपीतील अलाहाबाद येथे आहे. कोविड घोटाळ्याआधी भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात या संस्थेला दंड ठोठावण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com