Bullet Train
Bullet TrainTendernama

बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील कामांना वेग; पालघर आणि ठाणे जिल्ह्यात...

Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कामांना सध्या गती आली आहे. प्रकल्पाच्या पॅकेज-C3 अंतर्गत शिळफाटा ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत वेगवान काम सुरु आहे. या 135 किमी लांबी पट्ट्याच्या कामासाठीची तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यातील दोन बोगद्यांचे कामही सुरू झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी खांब उभारण्याचे काम सुरू झाले असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) सांगितले आहे.

Bullet Train
Mumbai : 700 एसी डबलडेकर ई-बसेसचा पुरवठा करण्यास 'कोसिस ई-मोबिलिटी प्रा. लि.' कंपनीचा नकार?

गर्डर्सच्या पूर्ण स्पॅन आणि सेगमेंट कास्टिंगसाठी कास्टिंग यार्ड उभे केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज C-3 अंतर्गत 135.45 किलोमीटर इतक्या लांबीचे काम होणार आहे. त्यात 24.027 किमी लांबीचे मार्ग आणि पूल आहेत. या प्रकल्पात 5.361 किमी भूभाग वापरला जात आहे. तसेच यात 12 स्टील पुलांसह 36 पूल आणि क्रॉसिंगचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये सहा बोगदे आणि एक कट-अँड-कव्हर बोगदादेखील असणार आहे. उल्हास, वैतरणा आणि जगनी नद्यांवर क्रॉसिंगही असेल. या विभागात ठाणे, विरार आणि बोईसरदरम्यान तीन बुलेट ट्रेन स्थानके येतील.

Bullet Train
Mumbai : हार्बर रेल्वेचा 'या' स्टेशनपर्यंत होणार विस्तार; पुढील महिन्यात 825 कोटींचे टेंडर

याशिवाय, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या समुद्राखालील पहिल्या बोगद्याचे बांधकाम सुद्धा सुरु झाले आहे. या बोगद्याची लांबी 21 किमी असेल. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथे भूमिगत स्थानकांदरम्यान हा पट्टा असेल अशी माहिती देण्यात आली आहे. बोगद्यांसाठी तीन बोरिंग मशीन्सचा वापर केला जात आहे. या मशीन्सचा वापर सुमारे 16 किमी भागासाठी केला जात आहे. 21 किमीपैकी उर्वरित 5 किमीसाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (NATM) वापरली जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडोअर प्रकल्पासाठी एकूण 1.08 लाख कोटी खर्च होणार आहेत. केंद्र सरकार 'एनएचएसआरसीएल'ला 10 हजार कोटी रुपये देणार आहे. यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा समावेश असून ते प्रत्येकी 5,000 कोटी रुपये देतील. उर्वरित रक्कम जपानकडून 0.1 टक्के व्याजाने कर्जाद्वारे घेतली जाणार आहे. हा प्रकल्प एकूण 508 किमी इतका लांब आहे.  

Tendernama
www.tendernama.com