Mumbai Ahmedabad Bullet Train: किती असेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट? सर्वसामान्यांना परवडणार का?

Mumbai Ahmedabad Bullet Train
Mumbai Ahmedabad Bullet TrainTendernama

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) ड्रिम प्रोजेक्ट असलेली देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train Project) सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 2026 पर्यंत बुलेट ट्रेन देशवासियांच्या सेवेत असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket News)

Mumbai Ahmedabad Bullet Train
Samruddhi Expressway: गोंदिया जिल्ह्यासाठी Good News! 'या' 23 गावांतील जमिनीला येणार सोन्याचा भाव

या बुलेट ट्रेनचे तिकीट नेमके किती असेल याबाबत उत्सुकता असतानाच बुलेट ट्रेनचे तिकिट सर्वसामान्यांना परवडणारे, विमानापेक्षा सुद्धा स्वस्त असणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, बोगद्याचे कामही प्रगतीपथावर आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनचे काम किती झाले आहे आणि त्याचे भाडे किती असेल याबाबतची माहिती दिली आहे.

वैष्णव यांनी म्हटले आहे की, सूरतमध्ये सकाळचा नाश्ता करून मुंबईत तुम्ही कामासाठी येऊ शकता. त्यानंतर रात्री पुन्हा तुमच्या कुटुंबाकडे परत जाऊ शकता. जगात जिथे-जिथे बुलेट ट्रेन आहेत तेथील 90 टक्के लोक लांबचा प्रवास बुलेट ट्रेननेच करतात.

Mumbai Ahmedabad Bullet Train
Akola : अकोल्यातील 'या' सिंचन प्रकल्पाची का झाली दुरावस्था?

बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे म्हणजेच तिकिट किती असेल? याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेनचे तिकिट विमानापेक्षा स्वस्त असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे असणार आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरसाठी 8 नद्यांवर पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 1.08 लाख कोटी रुपये इतका आहे. यातील 10 हजार कोटी केंद्र सरकारकडून खर्च केला जात आहे. तर, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार प्रत्येकी 5 हजार कोटींचा निधी देणार आहेत. तर, उर्वरित रक्कम जपानकडून कर्ज रुपाने घेतली जाणार आहे. याचा व्याजदर फक्त 0.1 टक्के इतके असणार आहे.

Mumbai Ahmedabad Bullet Train
Nashik : ड्रायपोर्टच्या रस्त्यासाठी भूसंपादनाचे दर जाहीर; हेक्टरी 70 लाख ते 1 कोटी रुपये देणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरवर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी स्थानके असणार आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम 2021 मध्ये सुरू झाले. भविष्यात दिल्ली ते अयोध्यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याबाबतही हालचाली सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com