Good News! म्हाडाचा मोठा निर्णय; मुंबईजवळ तब्बल २०० एकर जागेवर...

MHADA
MHADATendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीची मोठी संधी चालून आली आहे. अंबरनाथमध्ये मोठी गृहनिर्माण योजना उभी करण्याचे म्हाडाचे प्रयत्न आहेत. चिखलोली धरणाला लागून असलेल्या 200 एकर जागेचा त्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. या योजनेसाठी जपानच्या कंपनीसोबत म्हाडाची बोलणी सुरु आहेत.

MHADA
50 एसटी बस स्थानकांचे रुपडे पालटणार; एअरपोर्टच्या धर्तीवर बनणार

मुंबईत घरे उभारणीला मर्यादा येत आहेत. नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून घरे बांधण्यात येत आहेत. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु असल्याने उरण येथे मोठ्या गृह निर्माण योजनेचे नियोजन होत आहे. सध्या डोंबिवलीपुढे अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे ही जागा निश्चित करण्यात आली आहे.

MHADA
आता 'गाव तिथे म्हाडा'; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा...

अंबरनाथ शहरात म्हाडा मोठी गृहनिर्माण योजना उभारणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या 200 एकर जागेचा नुकताच म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मुंबई उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मोठी गृहनिर्माण योजना उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ही योजना आजवर म्हाडाने उभारलेल्या योजनांपैकी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी योजना असेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत म्हाडाचा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र या परिसरात जी कनेक्टिव्हीटी आहे, त्यामुळे या भागाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. चिखलोली धरणाच्या बाजूला असलेली 200 एकर जागा खरेदी करण्याचा म्हाडाचा विचार आहे.

MHADA
मुंबईत 'त्या' आठ एकर भूखंडावर म्हाडा बांधणार कमर्शियल कॉम्प्लेक्स

या जागेत आजवर म्हाडाकडून उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनांपैकी सर्वात मोठी योजना उभारली जाणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. अंबरनाथ शहरात एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांनी ही माहिती दिली. ज्या जागेवर हा प्रकल्प उभारण्याचा विचार आहे, त्या चिखलोलीच्या प्रस्तावित जागेचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन हे स्वतः उपस्थित होते. दरम्यान, या मोठ्या गृहनिर्माण योजनेसाठी जपानच्या कंपनीसोबत बोलणी सुरु असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com