‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर’ : 19 कंपन्याशी 75 हजार कोटींचे सामंजस्‍य करार; 50 हजार रोजगार

Chandrapur
ChandrapurTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल,  असे प्रतिपादन  वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Chandrapur
Nitin Gadkari : 'त्या' कार्यकर्त्यांच्या श्रमामुळेच आम्हाला चांगले दिवस! असे का म्हणाले गडकरी?

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 - इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह' चे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले. त्यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्‍सन, मनपा आयुक्‍त विपीन पालिवाल न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईडचे मधूर गुप्‍ता, कुमार वार, राकेश प्रसाद, राजेश झंझाड, जी. डी. कामडे, अलोककुमार मेहता, के. जी. खुबाटा, मधुसूदन रुंगटा  उपस्‍थ‍ित होते.

Chandrapur
Mumbai : अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल! शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधक का संतापले?

मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर हे आतापर्यंत कोळसा, सिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी ‘वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्ट, रेल्‍वे, रस्‍ते आदी पायाभूत सुविधा, कौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रम, संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिक, औद्योगिक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले.

Chandrapur
Mumbai : 'त्या' पुनर्विकास प्रकल्पातील नऊ हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे पार्किंग

50 वर्षांचे व्हिजन तयार करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्‍ह्याच्‍या  विकासासाठी, जिल्‍ह्याला समृद्ध व संपन्‍न करण्‍यासाठी पुढील 50 वर्षांचे व्हिजन तयार करावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्‍या. चंद्रपूरमध्‍ये अॅडव्‍हेंचर स्‍पोर्ट्स, वॉटर स्‍पोर्टस, पर्यटन, पर्यटकांसाठी इलेक्‍ट्रीक गाड्या, रिसॉर्टस, बांबू लागवड, मत्‍स्‍यव्‍यवसाय यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्‍ये स्‍टील प्‍लांट उभारणार - अलोककुमार मेहता
लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपचे संचालक (मायनिंग अँड स्‍ट्रॅटेजिक प्रोजेक्‍ट) अलोक कुमार मेहता यांनी महाराष्‍ट्रात येऊन सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍याची संधी मिळाल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. चंद्रपूरमध्‍ये 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्‍टील प्‍लांट सुरु करण्‍यात येणार असून त्‍या माध्‍यमातून 60 हजार प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, असे ते म्‍हणाले.

‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर’च्‍या उद्घाटन सत्रात लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह एकूण 19 सामंजस्‍य करार करण्‍यात आले. यामध्ये सुमारे 75 हजार 721 कोटी रुपयांचे करार करण्‍यात आले ज्‍याद्वारे या भागात 50 हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने या करारावर स्‍वाक्षरी केली. या विविध करारांवर आर्सेलर मित्‍तल निप्‍पॉन स्‍टील इंडिया लिमिटेडचे अलोककुमार मेहता, न्‍यू ईराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईड मेटल्‍सचे मधूर गुप्‍ता, चंद्रपूर सोलारचे राजेश ओसवाल, अंबुजा सिमेंट के. सुब्‍बलक्ष्‍मणन, अरविंदो रिअॅलिटी इन्‍फ्रोस्‍ट्रक्‍चर प्रा. लि. संजय मिश्रा, राजुरी स्‍ट्रील्‍सचे विपीन जैन व विवेक गुप्‍ता, सनफ्लॅग अँड स्‍टील कंपनी लिमिटेडचे एस. महादेवन अय्यर, अल्‍फालॉजिक टेक्‍सेस लिमिटेडचे अंशु गोयल, वेस्‍टर्न कोलफिल्‍ड लिमिटेड हर्षल दातार, अल्‍ट्राटेक एसीसीचे अतुल कंसन, डेस्टीनो मिनरल्‍सचे मोरेश्‍वर झोडे, एसआयएडी युएसएचे उमेश दिघे व अनंत एव्हियेशनचे संचालक यांनी स्‍वाक्षरी केल्‍या. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी भव्‍य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रदर्शनामध्‍ये कोळसा खाणी, खनिज, लोह – पोलाद, बांबू, मत्स्यव्यवसाय, पर्यटन सोबतच पुरवठा, डेअर, ग्रीन एनर्जी, रिअल इस्टेट, वाहन उद्योग, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्राशी संबंधित सुमारे 150 स्‍टॉल्‍स आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com