Mumbai : 'एमटीएचएल'वर कारसाठी भरावा लागणार एवढा टोल; मंत्रीमंडळाचा निर्णय

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50 टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
अजितदादांचा धडाका; 'या' राष्ट्रीय मार्गाचे गतीने काम न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करा

कारसाठी 500 ऐवजी 250 रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या दिडपट, दैनिक पास एकेरी पथकराच्या अडीच पट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नास पट अशी सवलत देण्यात आलेली आहे. अटल सेतू उभारणीकरिता एकूण 21,200 कोटी इतका खर्च आला असून त्या पैकी 15,100 कोटी इतके कर्ज घेण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पनवेल पासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे 15 कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान 500 रुपये इतकी बचत होईल.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mumbai-Goa महामार्गासाठी शेवटची डेडलाईन; अन्यथा कठोर कारवाई

अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या 0 ते 4 किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक (Noise Barrier) व अतिसंवेदनशील अशा भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) व माहूल येथील तेल शुद्धीकरण केंद्र ( Oil Refinery ) या 4 ते 10 किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसविण्यात आलेले आहेत. अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर म्हणजेच शिवडी ते न्हावा-शेवा सी-लिंकचा लोकार्पण सोहळा १२ जानेवारीला करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

तिसऱ्या महामुंबईला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) निर्माण केला जाणारा एमटीएचएल हा शिवडी-न्हावा चिर्ले २१.८ किलोमीटर लांबीचा सर्वात लांब सागरी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com