गडकरींची नागपुरात धडाकेबाज घोषणा; आता नागपूर-पुणे अवघ्या 6 तासांत

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

नागपूर (Nagpur) : धडाकेबाज घोषणांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात आज पुन्हा एकदा मोठ्या घोषणांचा बार उडवून दिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नागपूरमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्धाटनासाठी आलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर नव्या मोठ्या प्रकल्पाची घोषणा न करतील तर ते गडकरी कसले. मुंबई - नागपूर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग तयार झाल्यानंतर आता गडकरींनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला आहे. त्यामुळे नागपूरमधून पुण्याला जाणाऱ्या वैदर्भीयांसाठी गडकरींनी गुड न्यूज दिली आहे.

Nitin Gadkari
'या' बाह्यवळण मार्गामुळे जमिनीला सोन्याचे भाव! लवकरच मोजणी सुरू

नागपूर ते पुणे या प्रवासाला रस्तेमार्गे सुमारे १७ तास लागतात. हा प्रवास आता केवळ सहा तासात पूर्ण करण्यासाठी नवा महामार्ग तयार करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. कमी करण्याचा संकल्प केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. यासाठी नव्या महामार्गाची घोषणा त्यांनी केली आहे.

Nitin Gadkari
PUNE: 25 किमीच्या 'या' बोगद्याच्या कामाला लवकरच मुहूर्त?

नागपूरमध्ये एम्सचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार संपन्न झाले. या कार्यक्रमात गडकरींनी वरील घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबादहून पुण्यापर्यंत हायवे बनवत आहोत. लवकरच याच्या कामाला सुरवात होईल. त्यामुळे नागपूरहून पुण्याला केवळ सहा तासांत पोहोचता येईल. याशिवाय महाराष्ट्रात आम्ही सहा एक्सप्रेस वे बनवत आहोत. यामध्ये सूरत-चेन्नई महामार्गाचा समावेश आहे. यामध्ये दक्षिण भारताकडे जाण्यासाठी मुंबई-पुण्यातून जावे लागले. आता नव्या महामार्गामुळे नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई - पुण्यातील प्रदुषणही कमी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com