सावधान! चक्क डोंगर म्हातारा होतोय; २०० भूखंडांसाठी सिडकोकडून...

Cidco
CidcoTendernama

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई (Navi Mumbai) शहराचा लौकिक असलेल्या बेलापूर येथील पारसिक डोंगराच्या सपाटीकरणाचा धडाका सिडकोने पुन्हा एकदा सुरु केला आहे. हिलवर अंदाजे २०० भूखंड चिन्हांकीत केले आहेत. त्यापैकी जवळपास शंभर भूखंडांचे वाटप पूर्ण झाले. उर्वरित भूखंडांसाठी टेकडीचे सपाटीकरण केले जात आहे. त्यासाठी हजारो वृक्षांचाही बळी घेतला जात आहे.

Cidco
बीकेसीतील दोन भूखंडाच्या ई-ऑक्शन टेंडरिंगला तारीख पे तारीख...

पारसिक डोंगरावर मोठ्याप्रमाणात बांधकामे केली जात आहेत. सिडकोने या ठिकाणी अनेक भूखंड रेखांकित करून त्याची विक्री सुरू केली आहे. त्यासाठी डोंगराचा बळी घेतला जात असून जेसीबी लाऊन त्याची कापणी केली जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असून पावसाळ्यात भूस्ख्खलन होऊन दरडी कोसळण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. डोंगर पोखरण्याचा हा प्रकार त्वरित थांबवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह मुख्यमंत्र्याकडे केली आहे. यासंदर्भात नाट कनेक्ट फाउंडेशन या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे मुख्य वनसंवर्धक एस.व्ही रामाराव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

Cidco
लष्कराची मान्यता न मिळाल्याने पुणे-नाशिक हायस्पीडच्या मार्गात बदल

हिलवर अंदाजे २०० भूखंड चिन्हांकीत केले आहेत. त्यापैकी जवळपास शंभर भूखंडांचे वाटप पूर्ण झाले. उर्वरित भूखंडांसाठी टेकडीचे सपाटीकरण केले जात आहे. त्यासाठी संपूर्ण वाढलेल्या झाडांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप हरितप्रेमींनी केला आहे. मात्र, सिडकोने पर्यावरणाचा ऱ्हास करून आपले डोंगर पोखरण्याचे काम सुरूच ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Cidco
राणीबागेतील मत्स्यालयाचे 44 कोटींचे टेंडर का झाले रद्द?

विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या टेकडीच्या कापणीसंदर्भात मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण कारवाईसाठी वन विभागाकडे सुपुर्द केले होते. त्यानंतर काही दिवस पारसिक डोंगर कापण्याचे काम थांबले होते. परंतु, आता त्याच्या पूर्वेकडील बाजूला पुन्हा जेसीबी लावून सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे नाट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पारसिकच्या रहिवासी बाजूला नवीन स्थळावर कापणी सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com