Chakan Talegaon MIDC: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री शिंदेही सरसावले

रस्ते, वीज आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यासाठी १४ विभागांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश; चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरीची घोषणा
eknath shinde
eknath shindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai): चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याला प्राधान्य देतानाच पावसाळ्यात दुरुस्तीसाठी प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांनी एकत्रित कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

eknath shinde
Mumbai: रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगद्यांवर MMRDA खर्च करणार तब्बल 48 हजार कोटी

चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, विद्युत उपकेंद्र आणि रुग्णालयांसाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत ते दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.

१४ विभागांचा समन्वय

चाकण-तळेगाव परिसरातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांच्या समन्वयाने १४ विभागांचे अधिकारी काम करतील. जिल्हाधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी सर्व विभागांची बैठक घेऊन कामांना गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. मलनिस्सारण, घनकचरा, पाणी, रस्ते आणि वीज या परस्परांशी संबंधित सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासही सांगण्यात आले.

eknath shinde
Nitin Gadkari: नाशिक-पुणे महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7801 कोटी मंजूर

वीज आणि वाहतूक सुविधांवर भर

चाकण शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुजविण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपुलांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वीज समस्येसाठी महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन आहे. नवीन उपकेंद्रासाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करून देणार आहे.

बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

eknath shinde
Nashik Kumbh Mela 2027: मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर

Key Points

  • चाकण-तळेगाव एमआयडीसीतील खड्डे बुजविण्याला प्राधान्य.

  • पावसाळ्यात प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच वापरण्याचे निर्देश.

  • पायाभूत सुविधांसाठी १४ विभागांचा कृती आराखडा.

  • पुणे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार.

  • दर शुक्रवारी १४ विभागांची बैठक घेण्याचे निर्देश.

  • चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरीची घोषणा.

  • नवीन उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध होणार.

  • महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन.

  • आवश्यक ठिकाणी अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपुलांचे नियोजन.

  • दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश.

Tendernama
www.tendernama.com