मुंबईतील 'या' प्रकल्पाबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय;BMC म्हणते

Costal Road
Costal RoadTendernama

मुंबई (Mumbai) : कोस्टल रोड प्रकल्पाच्या (Costal Road Project) बांधकामासोबतच इतर सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदीला दिला आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी मोठा दिलासा देणारा हा निकाल आहे. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत लॅण्डस्केपिंग आणि अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला वेग मिळणार आहे. तसेच या आदेशामुळे मुंबई महापालिकेला नोव्हेंबर २०२३ मध्ये नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया महापालिका (BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

Costal Road
धारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु; 'नैना'ची तिसरी मुंबई...

एका स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पाच्या कामाव्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करण्यासाठी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सर्वोच्च न्यायालायने आपले याआधीचे आदेश सुधारीत करत इतर सुविधा निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा केला आहे. 
कोस्टल रोड प्रकल्पासाठी मोठे प्रोत्साहन देणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा सुधारीत आदेश दिला.

Costal Road
दौंड-उस्मानाबाद राज्यमार्ग कारवाईचा चेंडू आता सोलापुरातील...

सर्वोच्च न्यायालयाने सुधारीत आदेशात देताना पर्यावरणीय बदलांसाठी विकासाचे प्रकल्प थांबवू शकत नाही असे, आदेशात नमूद केले आहे. एखादा प्रकल्प पर्यावरणीय बदलांसाठी कारणीभूत ठरत असेल तर विकसनशील देशांनी असे विकास प्रकल्प थांबवू नयेत. सर्वोच्च न्यायालयाने आपले दोन वर्षे जुने आदेश सुधारीत करतानाच हा निकाल दिला. तसेच कोस्टल प्रकल्पासाठी संलग्न कामासाठीची परवानगीही या आदेशान्वये दिली. २०१९ च्या आदेशान्वये प्रकल्पासाठीची पर्यावरणीय मंजुरी अपुरी असल्यानेच न्यायालयाने या कामांसाठी स्थगिती दिली होती. आतापर्यंत रस्त्याचे काम अतिशय वेगाने सुरू होते. परंतु इतर संलग्न कामांसाठी न्यायालयाची मंजुरी नसल्यानेच ही कामे रखडली होती.

Costal Road
अखेर शिंदे सरकारने राज्यातील कामांवरील उठवली स्थगिती

फक्त विकसनशील देशांकडूनच प्रदूषण होत नाही, तर विकसित देशांकडूनही प्रदूषण होत असते. त्यामुळे विकसनशील देशांनी विकास प्रकल्प थांबवावेत, असा याचा अर्थ होत नाही, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नव्या आदेशानुसार महापालिकेला आता गार्डन परिसराचा विकास करता येणार आहे. तसेच पार्क, सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचाही विकास करणे शक्य होईल. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या कामासोबतच ही विकासकामे करणे शक्य होणार आहे. त्यामध्ये बटरफ्लाय पार्क आणि हाजी अली परिसरात कार पार्किंगची सुविधा निर्माण करणेही शक्य होईल. या कामांसाठी महापालिकेला प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागणार आहे.

लॅण्डस्केपिंगमुळे कोणत्या सुविधा मिळणार ?
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार २९५ चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलिस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त १ हजार ८५६ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. 


Costal Road
ऐन धम्मचक्र प्रवर्तन दिनी आंबेडकर अनुयायांची होणार कोंडी; कारण...

महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या आणि मुंबईकर नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणार्या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. यात 'लॅण्डस्केपिंग' प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी दिली आहे.

दक्षिण मुंबईतील श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजूच्या दरम्यान 'मुंबई सागरी किनारा रस्ता' बांधण्याची कार्यवाही सातत्याने प्रगतीपथावर आहे. या सागरी किनारा रस्त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण भराव क्षेत्रापैकी ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत.


Costal Road
टक्केवारीसाठी प्रकल्प अडकवणे खपवून घेणार नाही; फडणवीसांची तंबी

३ भूमिगत वाहनतळ -

प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत असणाऱ्या धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी एक वाहनतळ हे महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ असणार आहे. दुसरे वाहनतळ हे 'अमर सन्स गार्डन' जवळ असणार आहे. तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणा-या वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ८५६ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार असून त्यांच्या छतावरती उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

फुलपाखरू उद्यान
सागरी किनारा रस्त्याची उभारणी करण्यासाठी परवानगी देताना केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने 'बॉटॅनिकल बटरफ्लाय गार्डन' उभारण्याची अट घातलेली आहे. त्यानुसार उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रामध्ये महापालिकेद्वारे एक 'फुलपाखरु उद्यान' विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद देखील महापालिकेद्वारे करण्यात येत आहे.


Costal Road
ई-व्हेईकल घेणारे निश्चिंत; या शहरात पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स

जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक -
सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र 'जॉगिंग ट्रॅक' व 'सायकल ट्रॅक' उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

सागरी पदपथ -
सागरी किनारा रस्त्यालगत प्रस्तावित असणारा 'समुद्री पदपथ' (Promenade) हा मुंबईतील सर्वात मोठा 'समुद्री पदपथ' ठरणार असून तो सुमारे २० मीटर रुंद व साधारणपणे ७.५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा पदपथ समुद्राला जोडून व 'कोस्टल रोड'लगत बांधला जाणार असून तो प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंक दरम्यान असणार आहे. 

खुले नाट्यगृह -
नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेची अनेक नाट्यगृहे व खुली नाट्यगृहे आहेत. प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत देखील महापालिकेद्वारे एक खुले नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com