ऐन धम्मचक्र प्रवर्तन दिनी आंबेडकर अनुयायांची होणार कोंडी; कारण...

Deeksha Bhumi
Deeksha BhumiTendernama

नागपूर (Nagpur) ः धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त (Dhammachakra Pravartan Din) देश-विदेशातील लाखो नागरिक दिक्षाभूमीवर (Deeksha Bhumi) येतात. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना दिक्षाभूमीवर पोहोचण्यासाठी प्रमुख मार्ग असलेला सेंट्रल बाजार रोड उद्या १ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हजारो अनुयायांची कोंडी होणार आहे.

Deeksha Bhumi
दौंड-उस्मानाबाद राज्यमार्ग कारवाईचा चेंडू आता सोलापुरातील...

रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवर कल्पना बिल्डिंगपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता त्यापुढे जनता चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंतचा डावीकडील रस्ता पुढील दोन महिने बंद राहणार आहे. उद्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे. विशेष म्हणजे येत्या ५ सप्टेंबरला धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. या दिवशी दिक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी त्यांच्या अस्थिच्या दर्शनासाठी, तसेच दिक्षेसाठी येतात.

Deeksha Bhumi
टक्केवारीसाठी प्रकल्प अडकवणे खपवून घेणार नाही; फडणवीसांची तंबी

दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी सेंट्रल बाजार रोडही एक रस्ता आहेत. जनता चौकातून वळून नागरिक दिक्षाभूमीकडे जातात. दरवर्षी या रस्त्याने हजारो अनुयायी दिक्षाभूमी येथे पोहोचतात. परंतु महापालिकेने सेंट्रल बाजार रोडवरील कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंतच्या तीन वर्षांपासून थांबलेले रस्त्याचे काम अचानक धम्मचक्र प्रवर्तनदिन तोंडावर असताना सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनाची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे धम्मचक्र प्रवर्तनदिनी जनता चौकातून वळण घेऊन सेंट्रल बाजार रोडकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची कोंडी होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित काम ५ ऑक्टोबरपर्यंत रोखणे शक्य असतानाही महापालिकेने घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता बळावली आहे.

Deeksha Bhumi
पालकमंत्री भूसे काय निर्णय घेणार? नाशिकचे ६०० कोटींचे नियोजन...

आयुक्त राधाकृष्णन यांनी दिले आदेश
सिमेंट रोड बांधकामाकरिता सेंट्रल बाजार रोड, कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये या मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस डाव्या बाजुकडील मार्ग बंद करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. कंत्राटदाराने बॅरिकेड्स लावून स्वयंसेवक नेमावेत, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, एलईडी बॅटन, ब्लिंकर्सचा वापर करावा, याशिवाय वळणाबाबत फलक लावण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com