Ambulance Tender Scam : आधी पेपर पास झाले, नंतर परीक्षा फॉर्म भरला!

Rohit Pawar : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा
Tender Scam
Tender ScamTendernama

Ambulance Tender Scam News मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) घोटाळ्यात (Ambulance Scam) ज्या कंपनीला टेंडर (Tender) मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झाली आहे. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे, अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

Tender Scam
गडकरीसाहेब हे कसले काम? दीड वर्षातच 'या' नवीन पुलाचे लोखंडी बार बाहेर

Tanaji Sawant राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने टेंडर देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता.

राज्यातील अत्यावश्यक सेवांसाठी दावोसमध्ये एका स्पॅनिश कंपनीबरोबर करार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील 'सुमित' या कंपनीला हे टेंडर मिळाले आहे, असा आरोप देखील काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केला होता. अशातच आता पुन्हा रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.

Tender Scam
Nashik CCTV News : नाशिक शहरात 335 CCTV कार्यन्वित होण्यासाठी आता जुलैचा नवा मुहूर्त

राज्याच्या आरोग्य विभागातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या रुग्णवाहिका घोटाळ्यात ज्या कंपनीला टेंडर मिळाले, त्या कंपनीची स्थापनाच मुळी चक्क टेंडर मिळाल्यानंतर झाली आहे. म्हणजे आधी पेपर पास झाले आणि नंतर परीक्षेचा फॉर्म भरला असा हा सगळा सावळा गोंधळ आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

मर्जीतल्या लोकांना काम मिळावे म्हणून सर्व कायदे आणि नियम 'कात्रज'च्या धाब्यावर बसवणे, हे बाजारातून खेकडा विकत घेण्याइतके सोपे नाही! तरीही पोखरलेल्या व्यवस्थेने ते करून दाखवले. पण न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्याने आज नाही तरी उद्या मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नाही, असे खुले आव्हान रोहित पवार यांनी दिले आहे.

Tender Scam
Nagpur : महापालिका नाल्यांच्या पुलांवर लावणार सुरक्षाजाळी; निघाले टेंडर

दरम्यान, राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप आहे.

मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी तिप्पट दरवाढीचे तब्बल १० हजार कोटींचे रुग्णवाहिका टेंडर अखेर 'सुमित', स्पेनस्थित 'एसएसजी' आणि 'बीव्हीजी' कंपनीला बहाल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच आरोग्य विभागाने टेंडरची वर्क ऑर्डर ठेकेदारांना दिली आहे.

राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप होता.

'टेंडरनामा'ने अगदी सुरुवातीपासून हे जम्बो टेंडर पिंपरी चिंचवड येथील सुमित फॅसिलिटीज या कंपनीला मिळावे यासाठी सत्ताधाऱ्यांचे कसे प्रयत्न होते याचा पर्दाफाश केला आहे. तसेच टेंडरमधील त्रुटी, अनियमितताही वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com