Nagpur : महापालिका नाल्यांच्या पुलांवर लावणार सुरक्षाजाळी; निघाले टेंडर

NMC
NMCTendernama

नागपूर (Nagpur) : शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पूलांवर लोखंडी जाळी लावण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय नागपूर महापालिकेद्वारे घेण्यात आलेला आहे. पुलावरून कुणीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना म्हणून दहाही झोनअंतर्गत नाल्यांच्या पूलांवर दोन्ही बाजूला ही जाळी लावण्यात येणार आहे.

NMC
Navi Mumbai : महापालिका दोन ठिकाणी जलउदंचन केंद्र उभारणार; 71 कोटींचे बजेट

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमधून नाल्यांवरील 58 ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. या पूलांवर जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने टेंडर काढले आहे. 3 ते 4 कोटींचे कामाचे टेंडर काढल्या गेले आहे. आचारसंहिता संपल्या नंतर टेंडर उघडले जातिल. 10 जून पर्यंत टेंडर उघडून वर्कऑर्डर केल्या जाईल. पूलांवरून मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर उपाययोजना म्हणून मनपाद्वारे दहाही झोनमधील नाल्यांच्या 58 पुलांवर दोन्ही बाजूला मजबूत लोखंडी कठडे आणि त्यावर जाळी लावण्यात येत आहे.

NMC
Nagpur Metro : मेट्रो फेज-2चे 'या' कंपनीला मिळाले टेंडर

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत खामला चौक सहकारनगर घाट यासह एकूण 5 ठिकाणी सुरक्षा जाळी लावली जाणार आहे. याशिवाय धरमपेठ झोनमधील अंबाझरी ओव्हर फ्लो, यशवंत स्टेडियम नाग नदी, भोले पेट्रोल पम्प जवळील नाला यासह एकूण 11 ठिकाणी, हनुमान नगर झोनमधील मानेवाडा घाट बेसा रोड यासह एकूण 5 ठिकाणी, धंतोली झोनमधील नरेंद्र नगर चौक, सरदार पटेल चौक घाट रोड यासह एकूण 7 ठिकाणी, नेहरू नगर झोनमधील जगनाडे चौक नाला यासह एकूण 4 ठिकाणी, गांधीबाग झोनमधील गंगाबाई घाट पुलासह एकूण 5 ठिकाणी, सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर नाला जैन मंदिर जवळ यासह एकूण 5 ठिकाणी, लकडगंज झोनमधील कृषी विद्यापीठासह एकूण 5 ठिकाणी, आशीनगर झोनमधील अशोक चौक नाला यासह 6 ठिकाणी आणि मंगळवारी झोनमधील पोलिस तलाव चौक यासह 5 ठिकाणी सुरक्षा जाळी लावण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com