मुंबईतील मेट्रोसाठी सल्लागाराची नेमणूक; २६८ कोटीच्या टेंडरवर मोहोर

Metro
MetroTendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-भिवंडी आणि नवी मुंबई या पाच महानगरांना जोडणाऱ्या एकूण दोन मेट्रो मार्गांच्या स्थापत्य व प्रणाली कामांसाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए., मेसर्स डी. बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबी यांच्या संयुक्त २६८ कोटींच्या टेंडरला एमएमआरडीएने नुकतीच मान्यता दिली आहे.

Metro
मुख्यमंत्र्यांचा Nagpur Metroला बूस्टर डोस! 9279 कोटीच्या खर्चास..

दरम्यान, या दोन मेट्रो मार्गिकेंच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबवून कामास सुरुवात करणे अपेक्षित आहे. लवकरात लवकर हे टेंडर काढून या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांना विशेष बैठकीत केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) ठाण्यात सुरु असलेल्या या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा नुकताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी शिंदे यांनी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यासह 'एमएमआरडीए'मधील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली.

Metro
BMCसाठी शिंदे-फडणवीसांचे 'होऊ दे खर्च'! 1700 कोटींचा चुराडा करून..

मेट्रो-७ चा विस्तार करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे मेट्रो-१०चा प्रकल्प मांडण्यात आला आहे. मेट्रो-१० हा गायमुख ते शिवाजी चौक ९.२०९ किमीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४,४७६  कोटी इतका असून, त्यावर गायमुख, गायमुख रेती बंदर, वर्सोवा चारफाटा, काशीमीरा, शिवाजी चौक ही स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई, बोरीवली, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड व ठाणे येथील नागरिकांना फायदा होणार आहे. मेट्रो-१२ हा मेट्रो-५ चा विस्तार असणार असून संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४,४७६ कोटी इतका असून, या मार्गात १७ स्टेशन्स असणार आहेत. यात एपीएमसी कल्याण, गणेशनगर, पिसावलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. मेट्रो मार्ग क्रमांक-१० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजा या मार्गासाठी या सल्लागारांची निवड करण्यात आली आहे.

Metro
धारावीचा पुनर्विकास 3 महिन्यात होणार सुरु; 'नैना'ची तिसरी मुंबई..

'एमएमआरडीए'ने ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो, भूमिगत मार्ग, सागरीमार्ग असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांच्या कामांचा आढावा खासदार शिंदे यांनी घेतला. ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २०.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबवून कामास सुरुवात होणे अपेक्षित आहे. लवकरात लवकर टेंडर काढून या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना यावेळी शिंदे यांनी 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांना केली. मोठागाव ठाकुर्ली – माणकोली खाडीपूल आणि ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचाही खासदार शिंदे यांनी यावेळी आढावा घेतला. नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या ऐरोली – कटाई नाका उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com