'पांढरा हत्ती' ठरलेल्या मोनोचा महसूल वाढविण्यासाठी सल्लागार नेमणार

Mono Rail

Mono Rail

Tendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (एमएमआरडीए) (MMRDA) पांढरा हत्ती ठरलेला मोनो रेल प्रकल्पातून निधी मिळविण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरु केले आहेत. मोनो मार्गावरील व्यावसायिक जागा भाड्याने देऊन यामधून अधिक महसूल निर्माण करण्यासाठी प्रशासनाने सल्लागार नेमण्याचे ठरवले आहे. या कामासाठी एमएमआरडीएने टेंडर मागविली आहेत.

Mono Rail

बापरे! समृद्धी महामार्गावर कारसाठी भरावा लागेल एवढा टोल?

पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईला जोडणारा मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा डेपो हा पहिला टप्पा फेब्रुवारी 2014 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. तर वडाळा डेपो ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा मार्च 2019 मध्ये सुरु करण्यात आला. दोन्ही टप्पे सुरु झाल्यानंतरही मोनोकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने एमएमआरडीएला दरदिवशी लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

Mono Rail

टेंडरनामा इम्पॅक्ट; पुणे–सातारा रस्ता टोल रिलायन्सला खुलाशाचे आदेश

आर्थिक संकटात आलेला हा मार्ग नफ्यात आण्यासाठी एमएमआरडीएने प्रयत्न सुरु केले आहेत. मेट्रो वन जाहिरातीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते. याच धर्तीवर मोनोसाठी निधी उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार मोनो रेलचे विविध मार्गाने आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे.

Mono Rail

टेंडर काढून काम न करताच ५० कोटींचा गंडा; अधिकाऱ्यांवर गुन्हा

या कामासाठी 32.45 लाख रुपये खर्चाचे टेंडर नुकतेच काढण्यात आले आहे. पात्र कंपन्यांना 24 जानेवारीपर्यंत टेंडर सादर करता येईल. तर 17 जानेवारीला टेंडरपूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com