BMCची कोरोना काळातील टेंडर प्रक्रिया 'कॅग'च्या रडारवर

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेतील (BMC) कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मंगळवारी ‘कॅग’चे (महालेखा परीक्षक - CAG) पथक महापालिका मुख्यालयातील विविध खात्यांमध्ये दाखल झाले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतील बारा हजार कोटीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी ‘कॅग’कडून सुरू झाली आहे. पुढील महिनाभर सर्व कामांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘कॅग’च्या पथकाला सहकार्य करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना दिले आहेत.

BMC
Nashik: गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढा अन्यथा शुक्रवार पासून...

कोरोना काळात मुंबई महापालिकेत १२ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपने पालिका प्रशासनासह तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील स्थायी समितीलाही लक्ष्य केले होते. कोरोना काळात टेंडर प्रक्रिया न राबविता प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाय योजनांसह विविध प्रकारच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महापालिकेत कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारांपासून अन्य गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. राज्य सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी ‘कॅग’कडे सोपवले होते.

BMC
नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण...

‘कॅग’च्या अधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर ‘कॅग’च्या पथकाने मुंबई महापालिकेच्या लेखापाल विभागात जाऊन काही कागदपत्रांची व एकूणच व्यवहाराची माहिती घेतली. यावेळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे समजते. २८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी ‘कॅग’कडून करण्यात येणार आहे.

BMC
काहीही करा पण नागरिकांचे जीव वाचवा!

कोरोना काळात स्थायी समितीची मंजुरी न घेता हजारो कोटींचे प्रस्ताव मान्य करण्यात आलेले आहेत. वारंवार याला विरोध करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता ‘कॅग’मार्फत होणाऱ्या चौकशीतून सत्य समोर येईल.

- प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com