सीएसएमटीसह 'या' ३ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा

CSMT
CSMTTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी), नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता मिळाली आहे. पुर्नविकासानंतर या तिन्ही रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत.

CSMT
'शिंदे-फडणवीस अजून एक प्रकल्प राज्याबाहेर चाललाय, माहिती आहे का?'

देशभरात सध्या 199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरु आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी टेंडर जारी करण्यात आली आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरु आहे. 32 स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

CSMT
सरकारचा 'फोकस' पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर; 'या' योजनेला मंजुरी

पुर्नविकासानंतर या रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक स्थानकात दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांच्या जागांसह सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण होतील. रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना स्थानकाची इमारत असल्याने शहराच्या दोन्ही बाजू या स्थानकांनी जोडलेल्या असतील. फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असेल. रेल्वे स्थानकांना आरामदायी करण्यासाठी योग्य प्रकारची प्रकाशव्यवस्था, रस्ता शोधण्याचे नकाशे/खुणा, ध्वनी व्यवस्था, लिफ्ट/सरकते जिने/ट्रॅव्हलेटर्स असतील. वाहतूक सुलभ होण्यासाठी पुरेशा पार्किंग व्यवस्थेसह बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे. मेट्रो, बस इत्यादींसारख्या इतर परिवहन सुविधांसोबत एकात्मीकरण करण्यात येईल. सौर उर्जा, जल संवर्धन/पुनर्चक्रीकरण आणि सुधारित वृक्ष आच्छादनासह हरित इमारत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. दिव्यांग स्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. इंटेलिजन्ट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित करण्यात येतील. आगमन आणि प्रस्थान यांची स्वतंत्र विभागणी करणारी व्यवस्था असेल. सीसीटीव्हीसह विविध सुरक्षा सुविधांनी परिपूर्ण अशी रेल्वे स्थानके असतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com