इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतींबाबत गडकरींची मोठी घोषणा; 2023मध्ये...

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

मुंबई (Mumbai) : वाढत्या महागाईचे चटके सहन करत असलेल्या देशातील नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicles) वळावे म्हणून केंद्र सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या चढ्या किमती आणि या वाहनांच्या चार्जिंगचा मुद्दा पुढे येत असल्याने या प्रकारातील वाहनांना नागरिक आद्यापही मोठ्या प्रमाणात प्राधान्य देताना दिसत नाहीत. पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किमतींना इलेक्ट्रिक वाहन हा चांगला पर्याय असल्याचे सरकारकडून कितीही सांगितले जात असले तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या पार्श्वभूमिवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती लवकरच पेट्रोल वाहनांच्या किमतींच्या पातळीवर येतील, असे विधान त्यांनी केले आहे. (Electric Vehicle Price)

Nitin Gadkari
नागपूर, चंद्रपुरात मोठी कोळसा चोरी; कोणी लांबविला 578 मेट्रिक टन..

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यावर सरकारचा भर असून, प्रदूषणाचा स्तरही कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असे असले तरी सध्या किमती जास्त असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक निर्णयांचा सपाटा लावल्याचे सध्या दिसते आहे. इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्या खरेदीदाराच्या आवाक्यात आणण्यासाठी पावले उचलण्याची घोषणा गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे पुढील वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना मिळेल आणि त्याचा फायदा इलेक्ट्रिक वाहन उद्योगालाही होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

Nitin Gadkari
तगादा : उड्डाण पुलावरील तुटलेल्या केबल वायर कोण हटवणार?

इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढावा म्हणून देशातील प्रमुख महामार्गांवर 600 हून अधिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून टेंडर काढले जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे 2023 पर्यंत इलेक्ट्रिक वाहन उद्योगात क्रांती घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com